शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
3
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
4
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
5
दोन राज्यांतून भाजपसाठी वाईट बातमी; गेल्या वेळी शून्य, आता फक्त ५ जागांवर आघाडी
6
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
7
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
8
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
9
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
10
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
11
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
12
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
13
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
14
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
15
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
16
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
17
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
18
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
19
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
20
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
Daily Top 2Weekly Top 5

बीडमधील तरूणाईला पडला ‘मातृप्रेमा’ंचा विसर !

By admin | Updated: May 12, 2014 00:08 IST

सोमनाथ खताळ , बीड विविध सामाजिक संघटना, राजकीय संघटना, पक्ष यांच्याकडून होणारा विरोध झुगारूनही ‘फे्रंडशिप डे’ आणि ‘व्हॅलेंटाईन डे’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

 सोमनाथ खताळ , बीड विविध सामाजिक संघटना, राजकीय संघटना, पक्ष यांच्याकडून होणारा विरोध झुगारूनही ‘फे्रंडशिप डे’ आणि ‘व्हॅलेंटाईन डे’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, आईच्या प्रेमाची माहिती केवळ सोशल मिडीयापुरतीच मर्यादित झाल्याचेही दिसून आले. ‘आई म्हणजे एक नाव असतं... घरातल्या घरात गजबजलेलं एक गाव असतं...’ आईचे महात्म्य सांगणार्‍या या ओळीतून सर्वांना आईच्या विशाल रुपाचे दर्शन होते. अफाट, अगाध, अनंत वात्सल्याचा, पे्रमाचा आणि अवर्णनिय त्यागाचा ठेवा हृदयात जपणार्‍या ‘आई’बद्दल कितीही कृतज्ञता व्यक्त केली तरी ती कमीच आहे. मात्र, ‘मदर्स डे’ च्या निमित्ताने ही संधी आहे. रविवारी ‘मदर्स डे’ होता. मात्र, ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्यासाठी विरोध पत्करणार्‍या; प्रसंगी जिवाचा आटापिटा करणार्‍या तरूणाईला मातृदिनाचे विस्मरण होताना दिसून आले. सोशल मीडियावर संदेशाची रेलचेल आईबद्दलची कृतज्ञता शब्दांत व्यक्त करणार्‍यासाठीही मुलांकडे वेळ नव्हता. पण सोशल मिडीयावर मात्र मातेबद्दलचे प्रेम दाखविणार्‍या संदेशांची रेलचेल दिसून आली. आईचे महात्म्य सांगणार्‍या संदेशांनी इनबॉक्स फुल्ल झाल्याचे पहावयास मिळाले. वृद्धाश्रमाची गरज कशाला? अलिकडच्या काळात वृद्धाश्रमामध्ये गर्दी वाढताना दिसून येत आहे. आयुष्याच्या सायंकाळी आई-वडीलांना आश्रमाची वाट दाखवणे उचित नाही. ‘मदर्स डे’ साजरा करताना केवळ औपचारिकता म्हणून पार पाडण्याऐवजी या संस्कार केंद्राचा नीट सांभाळ केला तर वृद्धाश्रमाची गरज भासणार नाही. हे शक्य झाले तरच मदर्स डे साजरा केल्याचे सार्थक होईल, अशी प्रतिक्रिया प्राचार्य डॉ. नामदेव सानप यांनी व्यक्त केली. अनुभवाचे बोल काय म्हणतात...? माझ्याच नाही तर प्रत्येकाच्या जिवनातील प्रथम मार्गदर्शक ही आईच असते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जीवनातील यशाचे संपूर्ण श्रेय आईलाच द्यावे. अभ्यास न केल्यास माझ्यावर रागावणारी माझी आई वेळप्रसंगी शिक्षक झाली. तिच्या रागावण्यामागेही एकप्रकारे प्रेमाचा ओलावा होता. आज मी फक्त मातेमुळेच आहे. डॉ. संजय जानवळे यांनी आपले अनुभव सांगून जगातील सर्व मातांना आपला सलाम केला.