‘लोकमत सखी मंच’ तर्फे सासू-सून संमेलन
By Admin | Updated: July 12, 2014 01:14 IST2014-07-12T00:08:38+5:302014-07-12T01:14:28+5:30
लातूर : ‘लोकमत सखी मंच’च्या वतीने ‘सासू-सून संमेलन’ १४ जुलै रोजी दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात दुपारी ४ वाजता आयोजिण्यात आले आहे.
‘लोकमत सखी मंच’ तर्फे सासू-सून संमेलन
लातूर : ‘लोकमत सखी मंच’च्या वतीने ‘सासू-सून संमेलन’ १४ जुलै रोजी दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात दुपारी ४ वाजता आयोजिण्यात आले आहे.
खास सखी मंच सदस्यांसाठी हे संमेलन होत असून, संमेलनात इंट्रॉडक्शन राऊंड, परफेक्ट मॅचिंग फेरी, सादरीकरण फेरी, प्रश्नोत्तर फेरी अशा चार फेऱ्या होणार आहेत. दयानंद स्टार आर्केस्ट्रॉतर्फे सुरेल गाण्यांची मैफलही यावेळी होईल.
या कार्यक्रमात सासू-सुनांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन संयोजकांमार्फत करण्यात आले असून, या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व द्वारकादास शामकुमार, राजभोग आटा, मनोजा एजन्सी, स्नेहा ब्युटी पार्लर यांच्याकडे आहे. स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी प्रतीक्षा राजेमाने (मो. ८६२४८६१३०९), ओंकार धर्माधिकारी (९०९६३५९३९८) यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)