शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

मुलगी, जावयाच्या मदतीने सासूचे सेक्स रॅकेट; डमी ग्राहकाने 'हाय' मेसेज पाठवताच पोलिसांचा छापा

By सुमित डोळे | Updated: February 20, 2024 13:11 IST

गेल्या महिन्याभरात छत्रपती संभाजीनगरात सेक्स रॅकेटवरील ही सातवी कारवाई आहे.

छत्रपती संभाजीनगर : उच्चभ्रू वसाहतीत भाडेतत्त्वावर फ्लॅट घेऊन माधुरी सुरेश थोरात (४२, रा. विटखेडा) हिने मुलगी व जावयाच्या मदतीने सातारा, नक्षत्रवाडीत राजरोस सेक्स रॅकेट सुरू केले. अहमदनगर, नाशिकच्या मुलींना घरी आणून माधुरी हा देहविक्रीचा धंदा करत होती. उपायुक्तांच्या पथकाने रविवारी रात्री डमी ग्राहक पाठवून दोन घरांमध्ये छापा टाकत माधुरीसह जावई शरद संजय साबळे (२९) व रोहिणी शरद साबळे (२१) यांना रंगेहात पकडले. त्यांच्या तावडीतून ५ पीडितांची सुटका करण्यात आली. गेल्या महिन्याभरात शहरात सेक्स रॅकेटवरील ही सातवी कारवाई आहे.

उपायुक्त नवनीत काँवत यांना या रॅकेटविषयी माहिती प्राप्त झाली होती. त्यांनी सहायक पोलिस आयुक्त डॉ. रणजित पाटील यांना कारवाईच्या सूचना केल्या. पाटील, उपनिरीक्षक विनोद आबुज यांनी रविवारी रात्री बीड बायपासवर सापळा रचला. डमी ग्राहक व शरदमध्ये पैशांचा व्यवहार ठरल्यानंतर देहविक्रीची खात्री झाली. पोलिसांनी साताऱ्यातील गोपालनगरमध्ये सी. आर. रेसिडेन्सीच्या फ्लॅट क्रमांक ३ मध्ये मध्ये छापा टाकला. तेव्हा शरदसह त्याची पत्नी रोहिणी उपस्थित होती. तेथील पीडितेच्या चौकशीत शरदची सासू माधुरीच्या घरी आणखी मुली असल्याचे कळाले. त्यानंतर पोलिसांनी माधुरीचे घर गाठले असता तेथे चार पीडिता होत्या. माधुरीने देखील ग्राहकांच्या मागणीनुसार देहविक्रीसाठी मुली पुरवत असल्याची कबुली दिली. पीडितांची सुधारगृहात रवानगी करून तिघांना अटक करण्यात आली. निरीक्षक ब्रम्हा गिरी, सहायक निरीक्षक पांडुरंग भागिले, आबुज, सुरेश जारवाल, अंमलदार शोन पवार, संदीप क्षीरसागर, श्रीकांत काळे, योगेश गुप्ता, सागर पांढरे, दीपक शिंदे, सुनील गुमलाडू यांनी कारवाई पार पाडली.

'हाय' मेसेजचा अलर्टशरदने पोलिसांच्या डमी ग्राहकाला व्हॉट्सॲपवर पाच मुलींचे छायाचित्र पाठवले. ३ हजार रुपयांमध्ये व्यवहार ठरला. शरद ग्राहकाला अपार्टमेंटपर्यंत गाडी आणू देत नाही. तो डमी ग्राहकाला बीड बायपासवरुन त्याच्या दुचाकीवर घेऊन गेला. पैशांचा व्यवहार होताच त्याने फ्लॅटमधून पोलिसांना 'हाय'चा मेसेज पाठवण्याचा इशारा ठरला होता. डमी ग्राहकाकडून मेसेज प्राप्त होताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी फ्लॅट गाठला. ३ हजारांपैकी ५०० पीडितेला तर अडीच हजार तिघे ठेवत हाेते.

तो म्हणतो मित्र, सासू म्हणते भाचीपोलिसांना पाहताच शरदने उडवाउडवीची उत्तरे देणे सुरू केले. पोलिसांनीच पाठवलेल्या डमी ग्राहकाला मित्र तर पीडिता त्याची पत्नी असल्याचे सांगितले. माधुरीच्या घरात पोलिस पोहोचल्यानंतर चारही पीडिता बहिणीच्या मुली आहेत. माझी तब्येत बरी नसल्याने आल्याचे सांगत नाटक केले. सर्व मुली या २५ ते ३० वयोगटातील होत्या.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद