पुत्राच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु असतानाच मातेने सोडले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 16:32 IST2021-03-27T16:32:01+5:302021-03-27T16:32:42+5:30

एकाच घरातील आई आणि मुलगा दोन्ही मृत झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.

The mother died while preparing for her son's funeral | पुत्राच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु असतानाच मातेने सोडले प्राण

पुत्राच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु असतानाच मातेने सोडले प्राण

आडूळ ( औरंगाबाद ) :  पैठण तालुक्यातील ब्राम्हणगांव येथे आज एकाच दिवशी मुलगा व आईचे दुर्दैवी निधन झाल्याची घटना घडली आहे. हिरालाल खंडु गांगे आणि सखुबाई खंडु गांगे असे मृत माता-पुत्राचे नाव आहे. 

हिरालाल खंडु गांगे ( वय ४० ) हे गेल्या काही दिवसांपासून मुञपिंडाच्या आजाराने ञस्त होते. त्यामुळे त्यांना औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, आज ( दि. २७ )  पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यानंतर सकाळी त्यांचा मृतदेह त्यांच्या मुळगावी ब्राम्हणगाव येथे आणण्यात आला. अंत्ययात्रेची तयारी सुरु असतांनाच नातेवाईकांनी हिरालाल यांची वृध्द आई सखुबाई खंडु गांगे ( वय ७० ) यांना तुमचा मुलगा हिरालाल हा वारल्याचे सांगितले. हे ऐकताच त्याच क्षणी आईने ही आपले प्राण सोडले. 

एकाच घरातील आई आणि मुलगा दोन्ही मृत झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. हिरालाल गांगे यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,एक मुलगी,वडील असा परिवार आहे. या घटनेने गांगे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलगा व आई या दोघांच्या ही पार्थिवावर ब्राम्हणगावातील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: The mother died while preparing for her son's funeral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.