शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

आमदार निधीतून सर्वाधिक कामे रस्त्यांची

By admin | Updated: July 25, 2014 00:30 IST

नांदेड : जिल्ह्यात आजघडीला रस्त्यांची दुरवस्था दिसत असली तरी जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी आपला ८० टक्क्यांहून अधिक निधी हा रस्ते विकासावरच खर्च केला आहे़

नांदेड : जिल्ह्यात आजघडीला रस्त्यांची दुरवस्था दिसत असली तरी जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी आपला ८० टक्क्यांहून अधिक निधी हा रस्ते विकासावरच खर्च केला आहे़ जिल्ह्यात २०१०-११ ते २०१३-१४ पर्यंत १ हजार ३९४ रस्त्यांची कामे आमदार निधीतून झाली आहेत़ त्याखालोखाल विंधन विहिरी आणि सांस्कृतिक सभागृहावर आमदार निधीतून खर्च झाला आहे़ जिल्ह्यात ९ आमदार आणि १ विधान परिषद सदस्य आहे़ या लोकप्रतिनिधींनी आपल्याला मिळणाऱ्या स्थानिक आमदार निधीतून विकासासाठी सर्वाधिक पसंती ही रस्त्याला दिली आहे़ त्याखालोखाल पाणीपुरवठ्यासाठी विंधन विहिरींची कामे आमदार निधीतून घेण्यात आली आहेत़ जिल्ह्यात चार वर्षात ७२४ विंधन विहिरींची कामे झाली आहेत़ तर सांस्कृतिक सभागृहासाठीही आमदारांनी आपला निधी सढळ हस्ते दिला आहे़ त्यात चार वर्षातील कामांची संख्या ही ३९२ इतकी आहे़ त्यावर १६ कोटी ६४ लाख २९ हजार रूपये खर्च झाले आहेत़ आमदार निधीतून शैक्षणिक विकासासाठीही निधी देता येतो, सार्वजनिक ग्रंथालयांसाठी ग्रंथ खरेदी व बांधकामासाठीही निधी देता येतो़ जिल्ह्यातील एकाही आमदाराने निवडून आल्यानंतर २०१०-११ या पहिल्या वर्षात ग्रंथालयांसाठी १ रूपयाही निधी दिला नाही़ स्मशानभूमीच्या विकासासाठी काही प्रमाणात निधी दिला असला तरी तो अपुराच ठरला आहे़ २०१०-११ या वर्षात १४ स्मशानभूमीच्या कामांवर ३९ लाखांचा खर्च केला़ आमदार निधीतून जिल्ह्यात रस्त्यांच्या विकासावर २०१०-११ मध्ये १३ कोटी ११ लाख ४५ हजार रूपये खर्च झाला आहे़ तर २०११-१२ मध्ये १४ कोटी ४ लाख ७२ हजार, २०१२-१३ मध्ये ११ कोटी ८९ लाख ८८ हजार रूपये आणि २०१३-१४ मध्ये १० कोटी ९३ लाख १८ हजार रूपये खर्च झाले आहेत़ चालू आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्येही बहुतांशी आमदारांनी सुचविलेली कामे ही रस्त्यांची आहेत़ विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांच्या उद्घाटनांचा धडाका सुरू झाला आहे़ झालेल्या कामांचा दर्जा ही बाब मात्र अलहिदाच आहे़