अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जालन्यात मोर्चा, निदर्शने
By Admin | Updated: February 13, 2015 00:45 IST2015-02-13T00:29:39+5:302015-02-13T00:45:56+5:30
जालना : विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने गुरुवारी जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी जोरदार निदर्शने केली.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जालन्यात मोर्चा, निदर्शने
जालना : विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने गुरुवारी जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी जोरदार निदर्शने केली.
अंबड चौफुली येथून दुपारी हा मोर्चा निघाला. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना थकित वेतन ५ तारखेच्या आत द्या, सेवानिवृत्ती पेन्शनची अंमलबजावणी तात्काळ सुरू करा, मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदत निधी तात्काळ अदा करावा, नागरी प्रकल्पांमध्ये अंगणवाडीसाठी नगरपालिकेने स्वतंत्र जागा देऊन खोल्या बांधून द्याव्यात, जनश्री विमा योजनेची अंमलबजावणी करून अंगणवाडी पाल्यांना शिष्यवृत्ती व अपघातग्रस्तांना मदतीची तात्काळ अंमलबजावणी करावी, इत्यादी मागण्यांचा त्यात समावेश होता.
मोर्चेकऱ्यांच्या वतीने पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी.टी. केंद्रे यांना निवेदन सादर करण्यात आले. या मोर्चात देवीदास जिगे, अनिल जावळे, तारा बनसोड, चंद्रभागा जाधव, कांता करंडे, सुमनबाई सोळुंके, नंदा शिंदे, लताबाई लाड, एस.डी. इंगोले, आशा कुलकर्णी, वंदना साखरे, अनिता वनारसे, मंगल पगारे, चंद्रभागा पोखळे, पुष्पा सुफलकर, मनोरमा धावणे, गजाळा तळेकर, बाबासाहेब जिगे, मंदाताई तौर, छाया जाधव, कविता सादभद्रे, अलका धर्माधिकारी, चेतन काळे, सिद्धार्थ डोळसे, उषा तंगे आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)
मोर्चा विसर्जित झाल्यानंतर बोलताना देवीदास जिगे म्हणाले की, शासनाने गेल्या अनेक दिवसांपासून केवळ आश्वासने दिलेली आहेत. मात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत. त्यामुळे शासनाने आता तरी मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.