दुसर्‍या दिवशीही मान्सूनपूर्व पाऊस

By Admin | Updated: May 30, 2014 00:26 IST2014-05-29T23:52:44+5:302014-05-30T00:26:44+5:30

लोकमत चमू, उस्मानाबाद जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने गुरूवारी दुपारी वादळी वार्‍यासह जोरदार हजेरी लावली़ मेघगर्जनेसह बरसलेल्या पावसात वीज पडून दोन महिलांसह शेतमजुराचा मृत्यू झाला़

Monsoon rain in the next day | दुसर्‍या दिवशीही मान्सूनपूर्व पाऊस

दुसर्‍या दिवशीही मान्सूनपूर्व पाऊस

 लोकमत चमू, उस्मानाबाद जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने गुरूवारी दुपारी वादळी वार्‍यासह जोरदार हजेरी लावली़ मेघगर्जनेसह बरसलेल्या पावसात वीज पडून दोन महिलांसह शेतमजुराचा मृत्यू झाला़ तर पोल्ट्रीफॉर्मवरील पत्रे उडाल्याने ५० कोंबड्यांचा मृत्यू झाला़ तर शेकडो घरावरील पत्रे उडून गेली़ तर येणेगूर, सुरतगाव जवळील राष्ट्रीय महामार्गावर झाडे उन्मळून पडल्याने जवळपास तीन तास वाहतूक ठप्प झाली होती़ उस्मानाबाद शहरासह तालुक्याच्या काही भागात गुरूवारी दुपारी वादळी वार्‍यासह पाऊस झाला. तालुक्यातील बोरगाव (बु़) शिवारात फुलाबाई ढवळे (वय-६०) या जनावरे चारत असताना वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला़ याबाबत बालाजी ढवळे यांनी दिलेल्या माहितीवरून बेंबळी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे़ तालुक्यातील जुनोनी येथ्ील पांडुरंग माध्यमिक विद्यालयाचे तर गावातील अकबर श्ेख, दत्तात्रय पाटील, अमोल मुळे, निसार शेख, किरण गुरव, अनंत मुळे, नजमुद्दीन शेख, शिवाजी गवळी यांच्या घरावरील, गोठ्यावरील पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले़ याचा तलाठ्यांनी पंचनामा केला आहे़ लोहारा शहरासह तालुक्याच्या काही भागात दुपारी पाऊस झाला़ शहर व परिसरात लहान गारांचाही वर्षाव झाला़ तर उमरगा शहरासह काही भागात जवळपास अर्धा तास पावसाने हजेरी लावली़ (प्रतिनिधी)

Web Title: Monsoon rain in the next day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.