शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
2
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
3
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
4
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
5
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
6
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
7
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
8
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
9
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
10
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!
11
Pune Rape: तोंडावर स्प्रे फवारून तरुणीवर बलात्कार; डिलिव्हरी बॉयच्या कृत्यानं पुणे हादरलं
12
Mumbai Crime: शिक्षिका आधी कारमध्येच करायची बलात्कार, नंतर हॉटेलमध्ये...; वर्षभर केले विद्यार्थ्याचे शोषण; काय काय घडलं?
13
Bank of Baroda मध्ये जमा करा २,००,००० रुपये; मिळेल, ₹४७,०१५ चं फिक्स व्याज आणि हमीही, जाणून घ्या
14
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
15
आणखी एक मोठा अपघात, वैमानिकाचं नियंत्रण सुटलं, विमानतळाची भिंत तोडून विमान पुढे गेलं
16
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
17
कार खरेदीवर ४ लाखांपर्यंत डिस्काउंट; कंपन्या करत आहेत ‘स्टॉक’ क्लीअर
18
सिबिल स्कोअर खराब होता, स्टेट बँकेनं नोकरीच दिली नाही; कोर्टानंही म्हटलं, "पैशांच्या बाबतीत..."
19
भारताचा पाकिस्तानी सेलिब्रिटींना दणका, २४ तासांत पुन्हा एकदा सोशल मीडिया अकाउंट केले ब्लॉक!
20
पत्नीसोबत Post Office च्या स्कीममध्ये करा गुंतवणूक; दर महिन्याला मिळेल ₹९००० चं फिक्स व्याज

आई, आजोबा, मला पुन्हा दिसणार नाही का...? ‘श्वास’ची कहाणी पडद्यावरच नव्हे प्रत्यक्षातही

By संतोष हिरेमठ | Updated: May 16, 2025 17:53 IST

जागतिक नेत्रकर्करोग जनजागृती सप्ताह विशेष: आईच्या कुशीत खेळणाऱ्या मुलांची दृष्टी कमी होऊ लागते, तेव्हा कुणालाही कल्पना नसते की, तो डोळा कायमचा हरवणार आहे.

छत्रपती संभाजीनगर : ‘आजोबा, मला पुन्हा दिसणार ना?’, ‘श्वास’ चित्रपटातला परशाचा हा प्रश्न आजही काळजाचा ठाव घेतो. पण, फक्त पडद्यावरच नव्हे तर प्रत्यक्षातही अनेक परशा रोज डोळ्यांच्या कर्करोगामुळे आयुष्याशी झुंजत आहेत... अगदी आपल्या शहरात, छत्रपती संभाजीनगरमध्ये! एकट्या शासकीय कर्करोग रुग्णालयात वर्षाकाठी नेत्र कर्करोगाची सुमारे ३० बालके दाखल होत आहेत. ‘आई, मला पुन्हा तुझा चेहरा दिसणार नाही का...?’ हा लहानग्यांचा प्रश्न आईच्या काळजात खोलवर जखम करतो.

दरवर्षी जगभरात ११ ते १७ मे दरम्यान नेत्रकर्करोगाविषयी जनजागृती करण्यासाठी सप्ताह साजरा केला जातो. आईच्या कुशीत खेळणाऱ्या मुलांची दृष्टी कमी होऊ लागते, तेव्हा कुणालाही कल्पना नसते की, तो डोळा कायमचा हरवणार आहे. शासकीय कर्करोग रुग्णालयात (राज्य कर्करोग संस्था) अशी अनेक मुले दरवर्षी दाखल होतात. त्यांना असतो ‘रेटिनोब्लास्टोमा’. म्हणजेच डोळ्याचा कर्करोग. दरवर्षी सरासरी ३० बालके नेत्रकर्करोगाचे उपचार घेतात. बहुतेक वेळा आजार उशिरा लक्षात येतो, जेव्हा डोळा वाचवणे अशक्य होते. काहींचा एक डोळा तर काहींच्या दोन्ही डोळ्यांची शस्त्रक्रिया करावी लागते. म्हणजे काहींना एक डोळा गमवावा लागतो, तर काहींना दोन्ही. जग पाहायच्या आधीच अंधाराची शिक्षा त्यांच्यासाठी ठरते. पण तरीही या बालवीरांचा लढा थांबत नाही.

कोणता हा आजार?रेटिनोब्लास्टोमा हा डोळ्यात होणारा कर्करोग आहे. हा अनुवंशिकही असू शकतो. वयाच्या ५ वर्षांखालील मुलांमध्ये तो अधिक प्रमाणात आढळतो. डोळ्यात पांढरा चमकणारा ठिपका, पांढरे फूल पडले, असेही म्हटले जाते. सतत पाणी येणे, सूज, डोळा बाहेर आलेला दिसणे ही त्याची सुरुवातीची लक्षणे असतात.

११ मुलांचा अभ्यासबाल कर्करोग विभागातील वरिष्ठ निवासी डाॅ. सागर वर्तक यांनी नेत्रकर्करोग झालेल्या बालकांसंदर्भातील रिसर्च पेपर नुकत्याच झालेल्या पुणे रिसर्च सोसायटीच्या परिषदेत सादर केला. त्यात या रिसर्च पेपरला पहिला क्रमांक मिळाला. किमोथेरपीमुळे नेत्र कॅन्सरची गाठ कमी होण्यास कशाप्रकारे मदत होते, यासंदर्भात ११ मुलांचा अभ्यास करण्यात आला.

तिसऱ्या स्टेजमध्ये येणारे अधिकनेत्रकर्करोगाचे लवकर निदान झाल्यास डोळे वाचविणे शक्य होते. मात्र, आपल्याकडे कॅन्सरच्या तिसऱ्या स्टेजमध्ये येणाऱ्या बालकांचे प्रमाण अधिक आहे. वर्षभरात जवळपास ३० बालके नेत्रकर्करोगाचे येतात.- डाॅ. अदिती लिंगायत, बाल कर्करोग विभागप्रमुख, शासकीय कर्करोग रुग्णालय.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरcancerकर्करोगHealthआरोग्य