शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पतीने मारले, मुलाने वाईट वागणूक दिल्याने घराबाहेर पडलेल्या महिलेवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 13:24 IST

आठ दिवसांपुर्वी घर सोडलेल्या महिलेवर अत्याचार; पडेगावात बेशुद्धावस्थेत आढळली

छत्रपती संभाजीनगर : पतीने मारहाण केल्याने रागाच्या भरात घर सोडलेल्या ५० वर्षीय महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिलेवर सध्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून छावणी पोलिस ठाण्यात मंगळवारी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री अंदाजे ५० वर्षीय महिला जखमी बेशुद्धावस्थेत पडेगावच्या रस्त्यावर पडलेली स्थानिकांच्या निदर्शनास आली. पोलिसांनी धाव घेत तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी महिलेचा जबाब नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिला जबाब देण्याच्या स्थितीत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांच्या पाहणीत महिलेच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आहेत. शिवाय, तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी नोंदवला. घटनेची माहिती कळताच सहायक पोलिस आयुक्त महेंद्र देशमुख, निरीक्षक राजेंद्र होळकर, सहायक निरीक्षक सुषमा पवार, उपनिरीक्षक विकास खटके यांनी घाटीत धाव घेतली. पोलिस अंमलदार संजय रोकडे यांनी सरकारतर्फे याप्रकरणी तक्रार दाखल केली. सहायक निरीक्षक सुषमा पवार अधिक तपास करत आहेत.

आठ दिवसांपासून बाहेरसंबंधित महिला मूळची चाळीसगावची रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी तिला तिच्या पतीने मारहाण करून जखमी केले. मुलाने पैसे घेऊन वाईट वागणूक दिली. त्यानंतर ती पडेगावला माहेरी आली होती. मात्र, आठ दिवसांपासून ती तणावात बाहेरच फिरत होती. बरेच दिवस ती पडेगावातील एका दारूच्या दुकानासमोर देखील दिसून आली. त्याच दरम्यान रात्रीतून तिच्यावर अज्ञातांनी अत्याचार केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सदर प्रकरणात महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. शस्त्रक्रिया विभागात तिच्यावर उपचार सुरू आहे, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितले. डॉक्टरांच्या अहवालावरून याप्रकरणी अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकृती स्थिर झाल्यानंतर नेमके चित्र स्पष्ट होईल. याप्रकरणी सखाेल तपास सुरू असल्याचे सहायक आयुक्त महेंद्र देशमुख यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद