छत्रपती संभाजीनगर : अनेक वर्षांपासून शहरात ड्रग्ज, नशेच्या गोळ्या, पातळ औषधांच्या विक्रीचे साम्राज्य उभे करून अर्ध्याअधिक तरुणांना नशेच्या गर्तेत ढकलणारा कुख्यात ड्रग्ज स्मगलर शेख अश्पाक शेख इसाक (वय ३२, रा. रवींद्रनगर), त्याचा साथीदार दाऊद मुनावर पठाण (२८, रा. बायजीपुरा) व सरफराज मिर्झा हाफिज बेग (२७, रा. शहाबाजार) यांच्यासह त्याच्या १५ जणांच्या टोळीवर शहर पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली. सोमवारी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली.
लातूर, उदगीरमधून शहरात नशेच्या पातळ औषधांचा साठा घेऊन येणाऱ्या रॅकेटमधील १८ जणांना २५ जानेवारीपासून पोलिसांनी पकडले. टोळीचा म्होरक्या अश्पाक त्याच रात्री पसार झाला. त्यानंतर अजमेर, इंदूर, भोपाळ, मुंबई, हैदराबाद, नेपाळपर्यंत जाऊन लपला. १८ फेब्रुवारी रोजी शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी त्याला नाशिकच्या हॉटेलमधून उचलले.
आठ गंभीर गुन्हे दाखलअश्पाकवर खून, खुनाचे प्रयत्न, शस्त्र, ड्रग्ज तस्करीचे ८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. ड्रग्ज विक्रीतून त्याने मोठी माया कमावली. जिन्सी, सिटी चौक परिसरातील गरिबांमार्फत तो ड्रग्ज, गोळ्या विक्री करत होता. न ऐकल्यास त्यांना मारहाण करायचा. त्यामुळे त्याची परिसरात दहशत होती.
संपूर्ण टोळीच उद्ध्वस्तशेख अश्पाकसह त्याच्या टोळीतील शेख कलीम शेख सरदार, शेख मुस्ताक शेख इसाक, अविनाश ऊर्फ आवड्या शेषराव पाचुंदे, शेख सोहेल शेख सत्तार, अजय अनिल साळवे, शेख समीर शेख राजासाब, सय्यद अल्ताफ वहाब, सय्यद शाहेद अली सय्यद इब्राहिम, सय्यद रहीम सय्यद अन्वर, दाऊद मुनव्वर पठाण, सर्फराज मिर्झा हाफिज बेग, शेख हाफिज शेख सलीम, अनिता अविनाश पाचुंदे व अश्पाकचे व्यवहार सांभाळणारी इशरत अकीब शेख हिच्यावरही मोक्का कारवाई करण्यात आली. हे सर्व अद्यापही हर्सूल कारागृहात आहेत.
५२ लाखांचे अमली पदार्थ जप्त-कारवाईच्या सुरुवातीला अश्पाकच्या घरातून ५३.३२ ग्रॅम ड्रग्ज, ८ मोबाईल, ३.३६ लाख रोख, ८ लाखांचे दागिने, तलवारी जप्त करण्यात आल्या.-टोळीकडून एकूण ५२ लाख ७४ हजारांचा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.-नऊ महिन्यांत अश्पाकने ड्रग्जसाठी ४५ लाखांचे व्यवहार केले होते. त्याच्यासह इतरांची १३ खाती गोठविण्यात आली.
नववा मोक्का, ड्रग्जचे रॅकेट उद्ध्वस्तपोलिस आयुक्तांनी आतापर्यंत अजय ठाकूर, मुकेश साळवे, रवी काळे, सय्यद फैजल ऊर्फ तेजा सय्यद एजाज, शेख जावेद ऊर्फ टिप्या, सुमित रुपेकर यांच्यासह त्यांच्या ४८ साथीदारांवर मोक्काअंतर्गत कारवाई करत संघटित गुन्हेगारीचे रॅकेट उद्ध्वस्त केले.
Web Summary : Police in Chhatrapati Sambhajinagar invoked MCOCA against drug kingpin Ashpak Shaikh and 15 accomplices. Ashpak, wanted in multiple cases, was arrested in Nashik. Authorities seized drugs, cash, and assets worth ₹52 lakh and froze 13 accounts.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर पुलिस ने ड्रग सरगना अशफाक शेख और उसके 15 साथियों पर मकोका लगाया। कई मामलों में वांछित अशफाक को नासिक में गिरफ्तार किया गया। अधिकारियों ने ₹52 लाख के ड्रग्स, नकदी और संपत्ति जब्त की और 13 खाते सील किए।