मोदी लाट नांदेडात रोखावी लागली!

By Admin | Updated: May 18, 2014 01:23 IST2014-05-18T01:01:19+5:302014-05-18T01:23:49+5:30

मुजीब देवणीकर , औरंगाबाद देशभरात मोदी यांची लाट असताना नांदेड लोकसभा मतदारसंघात ही लाट रोखण्यासाठी काँग्रेसला बरेच प्रयत्न करावे लागले

Modi wave prevailed in Nanded | मोदी लाट नांदेडात रोखावी लागली!

मोदी लाट नांदेडात रोखावी लागली!

मुजीब देवणीकर , औरंगाबाद देशभरात मोदी यांची लाट असताना नांदेड लोकसभा मतदारसंघात ही लाट रोखण्यासाठी काँग्रेसला बरेच प्रयत्न करावे लागले. आपला विजय सहजासहजी म्हणता येणार नाही. त्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागले. मागील दहा ते पंधरा वर्षांमध्ये आपण जिल्ह्यासाठी केलेली विकासकामे मतदार विसरलेले नाहीत. विकासकामांची जाणीव त्यांनी या निवडणुकीत ठेवली ही विशेष बाब असल्याचे मत महाराष्टÑाचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. महाराष्टÑात काँग्रेसला दोनच जागा मिळाल्या. त्यासुद्धा मराठवाड्यातच. या यशाचे गमक काय, याची उत्सुकता उभ्या महाराष्टÑाला लागली आहे. निवडणूक निकालानंतर प्रथमच औरंगाबादेत आलेल्या अशोक चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना यशाचे गुपित उलगडले. खडकेश्वर येथील ‘साई शंकर’या निवासस्थानी रात्री चव्हाण यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. नरेंद्र मोदी यांनी महाराष्टÑात पहिली सभा नांदेडमध्येच घेतली होती. भाजपाचे मनसुबे आम्ही सुरुवातीलाच ओळखून घेतले. निवडणूक रणसंग्रामात प्रतिस्पर्ध्याला कमी न लेखता त्यांचे मनसुबे वेळोवेळी धुळीस मिळविण्यासाठी काँग्रेसची फळी तयार असायची. विरोधकांकडून प्रचारादरम्यान अपप्रचार होत होता. वेळीच त्याची दखल घेऊन नागरिकांना आपले म्हणणे स्पष्टपणे पटवून सांगावे लागत होते. निवडणूक म्हटले की, १९ ते २५ वयोगटातील तरुणांची भूमिका खूप महत्त्वाची असते. अनेक ठिकाणी मी या तरुणाईच्या प्रश्नांना थेट उत्तर देत असायचो. अगोदर त्यांचे म्हणणे काय असते हेसुद्धा शांतपणे ऐकून घेत असे, असेही चव्हाण यांनी नमूद केले. प्रचारात तरुणांची एक वेगळीच फौज आपण तयार केली होती. आपण तरुण असताना तरुणाईशी थेट संपर्क येत असायचा. आता आपले वय वाढल्याने त्यांच्याशी फारसा संवाद होत नाही. नांदेड लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रचारादरम्यान तरुणाईला ‘आप’ले करून घेणे खूप महत्त्वाचे असते. मतदारसंघात आपण जनसंपर्क नेहमीच दांडगा ठेवला होता. नागरिकांच्या सुख-दु:खात आवर्जून हजर राहणे. आलेल्या प्रत्येक ‘आम’आदमीला ताटकळत न ठेवणे, त्यांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावणे ही कामे सुरूच होती. मागील १५ वर्षांमध्ये नांदेड जिल्ह्यात मी अनेक विकासकामे केली. विकासकामांचा पाढा वाचला तर खूप मोठा होईल; पण ही कामे आपण केली आहेत, याची जाणीव सर्वसामान्यांना आहे, ही आनंदाची बाब असल्याचे प्रांजळपणे नमूद केले. मतदारांनी आपल्याला मनपा निवडणूक असो किंवा नगर परिषदेची प्रत्येक वेळी साथ दिली. कोणत्याही निवडणुकीत स्थानिक नेतृत्व खूप महत्त्वाचे असते. यंदा मतदारांनी कौल आपल्या बाजूने दिला. त्यांच्या विश्वासाला सार्थ ठरवीत आपण सोमवारीच दिल्लीला जाणार आहोत. खासदार म्हणून नांदेड जिल्ह्यासाठी आणि महाराष्टÑासाठी काय करता येईल याकडेच आपण भविष्यात लक्ष देणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. महाराष्टÑातील निकाल काँग्रेसला चिंतन करायला लावणारा आहे. भविष्यात परत राज्याचे नेतृत्व करण्याची संधी काँग्रेस हायकमांडने दिली तर आपण तयार आहात का? या थेट प्रश्नावर हसत हसत चव्हाण म्हणाले की, राजकारणात जर तर चालत नाही. खासदार म्हणून यापूर्वीही मी काम केले आहे, परत एकदा नागरिकांची सेवा करणार आहे. बाकी काहीच विचार केलेला नाही. औरंगाबाद : त्यांना ‘आप’ले करून घेणे खूप महत्त्वाचे असते. मतदारसंघात आपण जनसंपर्क नेहमीच दांडगा ठेवला होता. नागरिकांच्या सुख-दु:खात आवर्जून हजर राहणे. आलेल्या प्रत्येक ‘आम’आदमीला ताटकळत न ठेवणे, त्यांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावणे ही कामे सुरूच होती. मागील १५ वर्षांमध्ये नांदेड जिल्ह्यात मी अनेक विकासकामे केली. विकासकामांचा पाढा वाचला तर खूप मोठा होईल; पण ही कामे आपण केली आहेत, याची जाणीव सर्वसामान्यांना आहे, ही आनंदाची बाब असल्याचे प्रांजळपणे नमूद केले. मतदारांनी आपल्याला मनपा निवडणूक असो किंवा नगर परिषदेची प्रत्येक वेळी साथ दिली. कोणत्याही निवडणुकीत स्थानिक नेतृत्व खूप महत्त्वाचे असते. यंदा मतदारांनी कौल आपल्या बाजूने दिला. त्यांच्या विश्वासाला सार्थ ठरवीत आपण सोमवारीच दिल्लीला जाणार आहोत. खासदार म्हणून नांदेड जिल्ह्यासाठी आणि महाराष्टÑासाठी काय करता येईल याकडेच आपण भविष्यात लक्ष देणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. महाराष्टÑातील निकाल काँग्रेसला चिंतन करायला लावणारा आहे. भविष्यात परत राज्याचे नेतृत्व करण्याची संधी काँग्रेस हायकमांडने दिली तर आपण तयार आहात का? या थेट प्रश्नावर हसत हसत चव्हाण म्हणाले की, राजकारणात जर तर चालत नाही. खासदार म्हणून यापूर्वीही मी काम केले आहे, परत एकदा नागरिकांची सेवा करणार आहे. बाकी काहीच विचार केलेला नाही.

Web Title: Modi wave prevailed in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.