शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

संतपीठाचे दिक्षापीठ होऊन आधुनिक संत निर्माण व्हावेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 19:12 IST

संतपीठातून तुकाराम गाथा परिचय प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी शिवसेनेचे आमदार तथा जिल्हा प्रमुख आंबादास दानवे यांनी अर्ज केला

पैठण ( औरंगाबाद ) : संतपीठाचे रूपांतर जागतिक दर्जाच्या विद्यापीठात होऊन  संत साहित्य व सांप्रदायिक ज्ञानाच्या संशोधनातून या संतपीठातून आधुनिक संत निर्माण व्हावेत अशी अपेक्षा रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी सतपीठ लोकार्पण सोहळा समारंभात बोलताना व्यक्त केली. शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी  पैठण येथील संतपीठाचे ऑनलाइन उदघाटन केल्यानंतर संतपीठाच्या इमारतीत लोकार्पण सोहळा पार पडला. 

रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, विद्यापीठाचे कुलगुरू प्रमोद येवले, प्र-कुलगुरू शाम सिरसाठ, माजी प्र कुलगुरू तथा विद्यापीठ व संतपीठाचे समन्वयक प्रवीन वक्ते यांच्या हस्ते दिप प्रज्वलित करून संतपीठाचे प्रत्यक्ष उदघाटन व लोकार्पण करण्यात आले. या समारंभासाठी आमदार अंबादास दानवे, माजी मंत्री अनील पटेल, हभप विठ्ठल शास्त्री चनघटे, अण्णासाहेब लबडे, नाथ संस्थानचे विश्वस्त दादा बारे, नंदलाल काळे, विनोद बोंबले, ज्ञानेश्वर कापसे, विलास भुमरे, जितसिंग करकोटक, गणेश मडके, प्रशांत जगदाळे, राखी परदेशी, पुष्पा गव्हाणे, अलका पोटे, ज्योती पठाडे, मंगल मगर, किशोर चौधरी, सुनिल हिंगे, भूषण कावसानकर आदी मान्यवर उपस्थित होते.  

परदेशातून संत साहित्याचा अभ्यासाठी विद्यार्थी येतील  संतपीठाच्या विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रीया सुरू करावी असे निर्देश मंत्री भुमरे यांनी विद्यापीठ प्रशासनास यावेळी दिले.  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी बोलताना सांगितले की, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संतपीठाचे विद्यापीठात रूपांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे मंत्री भुमरे व माझी जबाबदारी वाढली आहे. संतपीठातून अभ्यासक्रम वाढविण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाची मुभा असल्याचे  मंत्री उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले. दिड महिण्याचा अवधी द्या संतपीठासाठी मोठा निधी उपलब्ध करून देऊ असेही मंत्री सावंत यांनी कुलगुरु येवले यांना उद्देशून सांगितले. वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी संतपीठातून संत रामदास स्वामी यांच्या नावाने कोर्स सुरू केला जाईल परंतु यासाठी थोडावेळ लागेल असे मंत्री सामंत यांनी सांगितले. परदेशातून संत साहित्याचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी या संतपीठात येतील या दर्जाचे संतपीठ होईल असे मंत्री सामंत यांनी यावेळी सांगितले. 

हेही वाचा - सौरऊर्जा प्रकल्प ते कनेक्टिव्हिटीत वाढ; मराठवाड्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महत्वपूर्ण घोषणा

संतपीठाचे दिक्षापीठ व्हावे संतपीठ ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून विषयाचे पुस्तकी व भौतिक ज्ञान देणारे अनेक विद्यापीठ आहेत. मात्र, संतपीठ हे दिक्षापीठ व्हावे अशी अपेक्षा विद्यापीठाचे कुलगुरू प्रमोद येवले यांनी व्यक्त केली. वारकरी शिक्षण संस्थांना संतपीठाची सलग्नता देण्यात येईल हा महत्त्वाचा निर्णय त्यांनी घोषीत केला. विद्यापीठ स्तरावर ३०० परदेशी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून संतपीठातील विषय त्यांना समजावून प्रवेश दिला जाईल असेही येवले यांनी यावेळी स्पष्ट केले.

आ. अंबादास दानवे संतपीठाचे पहिले विद्यार्थीसंतपीठातून तुकाराम गाथा परिचय प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी शिवसेनेचे आमदार तथा जिल्हा प्रमुख आंबादास दानवे यांनी अर्ज केला असून त्यांनी चार विविध विषयात एमए ही पदवी घेतली आहे. 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबाद