मोबाईल ‘कोड’ने तरुण संकटात

By Admin | Updated: April 18, 2016 00:51 IST2016-04-18T00:51:30+5:302016-04-18T00:51:30+5:30

औरंगाबाद : मित्राला घेऊन लग्नाला गेलेल्या एका तरुणाच्या दुचाकीला माघारी परतताना अमरप्रीत हॉटेल चौकात कुत्रे आडवे आल्यामुळे अपघात झाला.

Mobile 'code' in the young crisis | मोबाईल ‘कोड’ने तरुण संकटात

मोबाईल ‘कोड’ने तरुण संकटात

औरंगाबाद : मित्राला घेऊन लग्नाला गेलेल्या एका तरुणाच्या दुचाकीला माघारी परतताना अमरप्रीत हॉटेल चौकात कुत्रे आडवे आल्यामुळे अपघात झाला. शनिवारी मध्यरात्री १२.३५ वाजता ही घटना घडली. यावेळी रस्त्यावर फारसी वर्दळही नव्हती; परंतु मदत करणाऱ्यांनी त्याचा मोबाईल घेऊन नातेवाईकांना फोन लावण्याचा प्रयत्न केला, तर मोबाईलला ‘पिन कोड’ असल्यामुळे अडचणी आल्या. दामिनी पथकाच्या गस्तीवरील पोलीस कर्मचाऱ्यांनी बेशुद्धावस्थेतील तरुणाला घाटीत दाखल केले. त्यांनीही त्याच्या नातेवाईकांना ही माहिती कळविण्याचा प्रयत्न केला पण ‘पिन कोड’ असल्यामुळे संपर्क साधता आला नाही.
याबाबत दामिनी पथकाच्या फौजदार अरुणा घुले यांनी सांगितले की, अलोक फ्रान्सिस फर्नांडिस (२४, रा. ख्रिस्तनगर, छावणी) हा मित्राला घेऊन लग्नाला गेला होता. माघारी परतताना त्याने कॅनॉट परिसरात मित्राला सोडले. तो दुचाकी (क्र. एमएच २० सीई ४३१९) वरून घराकडे जात होता. जालना रोडवर अमरप्रीत चौकात अचानक कुत्रे आडवे आल्यामुळे अलोक रस्त्यावर पडला. डोक्यात हेल्मेट असल्याने त्याचा जीव वाचला; पण तो बेशुद्ध पडला.
मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे वाहनांची गर्दीही कमी होती. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांपैकी काहींनी त्याचा मोबाईल घेऊन नातेवाईकाचा फोन लावण्याचा प्रयत्न केला पण ‘पिन कोड’ असल्यामुळे ते शक्य झाले नाही.
दामिनी पथकाचे कर्मचारी एस. एम. बहिरव, महिला पोलीस कॉन्स्टेबल एस.बी. बनसोडे, पी. आर. शहाणे, पी. बी. पठाण आणि चालक वैशाली ढेपे यांनी अलोकला घाटीत दाखल केले. उपचारानंतर अलोक शुद्धीवर आला. त्यानंतर या अपघाताची माहिती त्याची बहीण वैशालीला देण्यात आली. तिचा जबाब घेण्यात आला असून अलोकवर सध्या छावणीतील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहेत.

Web Title: Mobile 'code' in the young crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.