शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद अध्यक्षपदाची रणनीती ठरविण्यासाठी मनसेचे सदस्य मुंबईकडे

By admin | Updated: September 10, 2014 00:52 IST

जिल्हा पदाधिकाऱ्यांसह मनसेचे आठही जि.प. सदस्य मुंबईकडे रात्री रवाना झाले.

औरंगाबाद : नाशिक महापालिकेत मनसेची सोबत सोडून भाजपा शिवसेनेसोबत गेल्याच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षाच्या निवडीचे डावपेच ठरविण्यासाठी मनसेच्या सदस्यांना पक्षश्रेष्ठींनी विचारविमर्श करण्यासाठी मुंबईला पाचारण केले आहे. जिल्हा पदाधिकाऱ्यांसह मनसेचे आठही जि.प. सदस्य मुंबईकडे रात्री रवाना झाले.
नाशिक महापालिकेत गेल्या अडीच वर्षांपासून सत्तेत असलेली मनसे, भाजपा युती मंगळवारी तुटली. भाजपाने शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या आठ सदस्यांसह तीन जिल्हाध्यक्षांना पक्षनेते आ. बाळा नांदगावकर यांनी तातडीने मुंबईला बोलाविले. औरंगाबाद जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसे आघाडीची सत्ता गेल्या अडीच वर्षांपासून आहे. या सत्तेतून मनसेला दोन सभापतीपदे मिळाली आहेत; परंतु अडीच वर्षांत काम वाटपावरून आघाडीत ताणतणावाचे अनेक प्रसंग घडले. त्यातून मनसेचे काही सदस्य नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जि.प.साठी मनसेचे डावपेच काय राहतील, हे उद्या मुंबईत ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मनसेला सोबत घेतल्याशिवाय आघाडी किंवा युती सत्ता स्थापन करू शकत नाही. त्यामुळे मनसेचे महत्त्व वाढलेले आहे.