शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Raj Thackeray: सभेपूर्वी मनसेला आणखी एक झटका, औरंगाबादचे माजी जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 08:58 IST

Raj Thackeray Rally In Aurangabad: मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

औरंगाबाद: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) येत्या 1 मे रोजी औरंगाबादमध्ये भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेला अद्याप पोलिसांनी सभेसाठी परवानगी दिलेली नाही. तसेच, जमावबंदीचे आदेश लागू झाल्यामुळे सभेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यातच आता मनसेला आणखी एक धक्का बसलाय. औरंगाबाद मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे (Suhas Dashrathe) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

भाजपमध्ये जाहीर प्रवेशआधीच पोलिसांकडून मनसेला सभेसाठी परवानगी देण्यात आलेली नाही. त्यात जमावबंदी लागू झाल्यामुळे मनसेसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. या सर्वात औरंगाबाद जिल्ह्यातील मनसेचे फायरब्रँड नेते अशी ओळख असलेले सुहास दशरथे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे मनसेच्या सभेवर मोठा परिणाम पडणार आहे. यातच आता सुहास दशरथे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल.

चार महिन्यांपूर्वी उचलबांगडीसुहास दशरथे हे औरंगाबाद जिल्ह्यातील मनसेचे मोठे नाव होते. त्यांच्या नेतृत्वात मनसेने जिल्ह्यात मोठी लोकप्रियता मिळवली होती. पण, पक्षांतर्गत कारणांमुळे चार महिन्यांपूर्वी त्यांची जिल्हाध्यक्ष पदावरुन उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी सुमित खांबेकर यांना जिल्हाध्यक्षपद देण्यात आले. तेव्हापासूनच दशरथे पक्षावर नाराज होते. तसेच, ते इतर पक्षांच्या संपर्कातही होते. आता अखेर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेस करण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित बातमी- औरंगाबादमध्ये 13 दिवस जमावबंदी लागू, राज ठाकरेंच्या सभेवर प्रश्नचिन्ह... 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAurangabadऔरंगाबादMNSमनसे