शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांनी सुचविली दहा कोटींची कामे

By admin | Updated: July 22, 2014 00:36 IST

औरंगाबाद : विधानसभेच्या येत्या निवडणुकीपूर्वी चालू आर्थिक वर्षाचा सर्व विकास निधी खर्च करण्याचे प्रयत्न आमदारांकडून सुरू आहेत.

औरंगाबाद : विधानसभेच्या येत्या निवडणुकीपूर्वी चालू आर्थिक वर्षाचा सर्व विकास निधी खर्च करण्याचे प्रयत्न आमदारांकडून सुरू आहेत. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यातील आमदारांनी प्रशासनाला तब्बल ९ कोटी ८३ लाख रुपयांची विविध कामे सुचविली आहेत. आणखी तीन कोटी रुपयांचा विकास निधी शिल्लक असून, त्यातील कामेही लवकरच सुचविली जाण्याची शक्यता आहे.आमदारांना त्यांच्या मतदारसंघात विकासकामे करण्यासाठी राज्य शासनातर्फे दरवर्षी २ कोटी रुपयांचा निधी दिला जातो. २०१४-१५ वर्षासाठी जिल्ह्यातील ९ विधानसभा सदस्यांना १८ कोटी रुपयांचा विकास निधी मिळालेला आहे. त्यातील सुमारे ५ कोटी ३१ लाख रुपयांची रक्कम ही गेल्या वर्षीच्या अर्धवट कामांवर खर्च होणार आहे. उर्वरित १२.६९ कोटी रुपयांपैकी आतापर्यंत तब्बल ९.८३ कोटी रुपयांच्या कामांचे प्रस्ताव या आमदारांनी जिल्हा प्रशासनाला सादर केले आहेत. २.८६ कोटी रुपयांचा निधी शिल्लक एप्रिलपासून आतापर्यंत तीन महिन्यांत हे प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यामुळे आता आमदारांच्या विकास निधीतील आणखी केवळ २.८६ कोटी रुपयांचा निधी शिल्लक आहे.विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी हा निधी खर्च करण्याचा आमदारांचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे आमदारांकडून जिल्हा प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणावर कामांचे प्रस्ताव प्राप्त होत आहेत. येत्या महिनाभरात या निधीतून विविध कामे सुचविली जाणार आहेत. जिल्हा नियोजन अधिकारी एच. बी. अहिरे यांनी सांगितले की, आमदारांनी विकासकामे सुचविल्यानंतर प्रशासनातर्फे त्याला मंजुरी दिली जाते. त्या- त्या वर्षाचा निधी खर्च करण्यासाठी त्याच वर्षात कामे सुचवून मंजुरी घ्यावी लागते. ही मंजुरी घेतल्यानंतर ते काम करण्यासाठी दोन वर्षांची मुदत असते. त्यात केव्हाही हे काम केले जाऊ शकते. आतापर्यंत आ. संजय शिरसाट यांनी चालू वर्षात ५५ लाख, संजय वाघचौरे यांनी ९५ लाख, हर्षवर्धन जाधव यांनी १ कोटी ६९ लाख, कल्याण काळे यांनी १ कोटी २ लाख, आर. एम. वाणी यांनी १ कोटी ३४ लाख, प्रशांत बंब यांनी १ कोटी २० लाख, प्रदीप जैस्वाल यांनी १ कोटी ३१ लाख, अब्दुल सत्तार यांनी १ कोटी ७६ लाख रुपयांची कामे सुचविली आहेत.