आ. संजय शिरसाट यांच्या मुलाच्या मालकीचा ट्रॅक्टर चोरीला

By बापू सोळुंके | Updated: May 7, 2023 17:28 IST2023-05-07T17:28:50+5:302023-05-07T17:28:59+5:30

माजी नगरसेवक सिद्धांत संजय शिरसाट यांनी दाखल केली तक्रार.

MLA Sanjay Shirsat's Son's tractor stolen, case filed | आ. संजय शिरसाट यांच्या मुलाच्या मालकीचा ट्रॅक्टर चोरीला

आ. संजय शिरसाट यांच्या मुलाच्या मालकीचा ट्रॅक्टर चोरीला

छत्रपती संभाजीनगर : शिवसेना आमदार संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत यांच्या मालकीचा पाच लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर चोरट्यांनी सातारा परिसरातून लंपास केल्याची घटना दि. ४ मे रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, माजी नगरसेवक सिद्धांत संजय शिरसाट यांनी त्यांच्या व्यवसायासाठी ट्रॅक्टर (एमएच २०एफयू ८९२६) खरेदी केलेला आहे. हा ट्रॅक्टर त्यांनी दि. ३ मे रोजी सायंकाळी सातारा परिसरातील तंत्रज्ञनगर येथे उभा करून ठेवला होता. हा ट्रॅक्टर चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. यानंतर त्यांनी सातारा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिस हवालदार धुळे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Web Title: MLA Sanjay Shirsat's Son's tractor stolen, case filed