शिक्षकांची मूळ कागदपत्रे गहाळ

By Admin | Updated: June 27, 2014 01:02 IST2014-06-27T01:00:26+5:302014-06-27T01:02:41+5:30

औरंगाबाद : शिक्षणसेवकपदी नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या पडताळणीसाठी २००७ पासून घेतलेली कागदपत्रे शिक्षकांना देण्यात प्रशासनाचा चालढकलपणा सुरू आहे.

Missing original documents of teachers | शिक्षकांची मूळ कागदपत्रे गहाळ

शिक्षकांची मूळ कागदपत्रे गहाळ

औरंगाबाद : शिक्षणसेवकपदी नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या पडताळणीसाठी २००७ पासून घेतलेली कागदपत्रे शिक्षकांना देण्यात प्रशासनाचा चालढकलपणा सुरू आहे. सदर कागदपत्रे गहाळ झाल्याची भीती शिक्षक व्यक्त करीत असून, कागदपत्रांसाठी आंदोलनाचा इशारा प्राथमिक शिक्षक संघाने दिला आहे.
नवनियुक्त शिक्षणसेवकांची शैक्षणिक पात्रता पडताळणीसाठी सदर मूळ कागदपत्रे प्रशासनाने घेतली होती. त्यात शाळा सोडण्याचा दाखला, दहावी, बारावी, डी. एड., परीक्षेची प्रमाणपत्रे व गुणपत्रांचा समावेश आहे. सदरची कागदपत्रे महाराष्ट्र शिक्षण परिषद, पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येते. मूळ कागदपत्रे नसल्यामुळे शिक्षकांची सेवापुस्तिका बनविण्यासह अन्य कामे प्रलंबित आहेत. विशेष कर्मचाऱ्याची नियुक्ती करून सदर कागदपत्रे आणावीत, अशी सूचना संघटनेने केली आहे. या पत्रकावर मधुकर वालतुरे, जिल्हाध्यक्ष काकासाहेब जगताप, कैलास गायकवाड, शेख हारूण, प्रशांत हिवर्डे, रमेश जाधव, प्रवीण पांडे, शेख अन्वर, अंकुश जाधव, संतोष थोरात, बळीराम भुमरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Missing original documents of teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.