घाणेगावातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता

By | Updated: November 29, 2020 04:06 IST2020-11-29T04:06:32+5:302020-11-29T04:06:32+5:30

वाळूज महानगर : घाणेगाव येथून १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आईने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दिली ...

Minor girl goes missing from Ghanegaon | घाणेगावातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता

घाणेगावातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता

वाळूज महानगर : घाणेगाव येथून १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आईने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दिली आहे. गुरुवारी रात्री रितू गायकवाड ही घरातून अचानक बेपत्ता झाली. रात्री ११.३० वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कुटुंबीयांनी परिसरात सर्वत्र तिचा शोध घेतला. मात्र, ती कुठेही आढळून न आल्यामुळे तिच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-----------------------

वडगावात दारु विक्रेत्यास पकडले

वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी येथे अवैधरित्या देशी दारुची विक्री करणाऱ्या एकास एमआयडीसी वाळूज पोलिसांनी शुक्रवारी पकडले. आरोपी सुधीर पांडुरंग बनकर (रा.वडगाव) याच्या ताब्यातून ८८४ रुपये किमतीच्या दारुच्या बाट्या जप्त करण्यात आल्या आहे. वडगावात चोरट्यामार्गाने देशी दारुची विक्री होत असल्याची माहिती मिळताच शुक्रवारी सांयकाळी ५ वाजेच्या सुमारास पोलिसांनी वडगावात छापा मारला. यावेळी संशयित आरोपी सुधीर बनकर याच्या ताब्यातून देशी दारुच्या १७ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

-----------------

वाळूजच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश

वाळूज महानगर : वाळूज येथील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नकुताच भारतीय दलित पँथरमध्ये प्रवेश केला. प्रवेश घेणाऱ्या कार्यकर्त्यांचा अ‍ॅड. रमेशभाई खंडागळ यांच्या हस्ते सत्कार करुन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला हिरालाल मगरे, गणेश चव्हाण, भैय्यासाहेब चव्हाण आदीसह पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

------------------------------

बजाजनगरात महात्मा फुले यांना अभिवादन

वाळूज महानगर : बजाजनगरातील शहीद भगतसिंह हायस्कूलमध्ये आज शनिवारी महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दामोधर मानकापे, तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापिका वर्षा जाधव, प्राथमिकचे मुख्याध्यापक नितीन देशमुख यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरवातीला महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.

-----------------------------

सिडको कृती समितीची आज बैठक

वाळूज महानगर : सिडको वाळूजमहानगर बचाव कृती समितीच्यावतीने उद्या रविवारी सकाळी ९ वाजता ए.एस. क्लब येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत सिडको प्रशासनाने वाळूजमहानगर प्रकल्प रद्द केल्यामुळे आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन कृती समितीचे अध्यक्ष नागेश कुठारे यांनी केले आहे.

----------------------------

शहर बसची संख्या वाढवा

वाळूज महानगर : वाळूजमहानगर परिसरात शहर बसची संख्या कमी असल्यामुळे प्रवाशी व विद्यार्थ्यांना खाजगी वाहनातुन प्रवास करावा लागत आहे. औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यात काम करण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणात कामगार उद्योगनगरीत येत असतात. याशिवाय वाळूज परिसरातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात ये-जा करीत असतात. मात्र, शहर बसची संख्या कमी असल्यामुळे प्रवाशांनी खाजगी वाहतुक करणाऱ्या अ‍ॅपेरिक्षा व काळी-पिवळी आदी वाहनातुन दाटीवाटीने प्रवास करावा लागत आहे.

---------------------

मोरे चौकात सिग्नल बेवारस

वाळूज महानगर : बजाजनगरातील रमेश मोरे चौकातील वाहतुक सिग्नलवर तैनात पोलिस कर्मचारी गायब राहत असल्यामुळे वाहनधारक सिग्नल तोडुन जात आहेत. सकाळी उशिरापर्यत या सिग्नलवर पोलिस कर्मचारी हजर राहत नसल्यामुळे वाहनधारक सुसाट वेगाने सिग्नलवरुन वाहने पळवित असतात. दुपारी १ वाजेनंतत पोलिस कर्मचारीही सिग्नलवरुन निघुन जात नसल्यामुळे या चौकात सतत वाहतुकीची कोंडी होत आहे.

------------------------

धरमकाटा रोडवर वाहने रस्त्यावर

वाळूज महानगर : पंढरपूरातील तिरंगा चौकातून बजाजनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने उभी राहत असल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. या धरम काट्यावर वजन करण्यासाठी येणारे वाहनेही रस्त्यावर थांबतात. या शिवाय लगतच असलेल्या एका दुचाकी शोरुमच्या नवीन गाड्याही रस्त्यावरच उभ्या केल्या जात असल्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना कसरत करावी लागत आहेत.

-------------------------

Web Title: Minor girl goes missing from Ghanegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.