शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

घर सांभाळण्यासाठी थांबलेल्या अल्पवयीन मुलानेच नातेवाईकाचे दागिने पळविले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 6:34 PM

घर सांभाळण्यासाठी थांबलेल्या १७ वर्षीय विधी संघर्षग्रस्त बालकाने नातेवाईकाच्या घरातून ११ तोळ्याचे दागिने लंपास केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले.

औरंगाबाद : घर सांभाळण्यासाठी थांबलेल्या १७ वर्षीय विधी संघर्षग्रस्त बालकाने नातेवाईकाच्या घरातून ११ तोळ्याचे दागिने लंपास केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. सिडको पोलिसांनी त्या अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चोरीचे दागिने जप्त केले. 

याविषयी अधिक माहिती देताना सिडको पोलिसांनी सांगितले की, सिडकोतील रहिवासी सुरजदास वैष्णव हे सिडको एन-६ येथे पत्नी, दोन मुले आणि वडिलासह राहतात.  सिडकोतच राहणाऱ्या त्यांच्या मावसबहिणीचे  ६ नोव्हेंबर रोजी सकाळी  निधन झाल्याचे कळताच ते  लगेच तेथे गेले.  त्यानंतर काही वेळाने  सिडको एन-६ येथे गेले. दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास  पत्नी , दोन्ही मुले आणि वृद्ध वडिलासह नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी १७ वर्षीय नातेवाईकाला  घर सांभाळण्यासाठी घरी ठेवले, घराच्या चाव्याही त्याच्याकडे दिल्या. 

काहीवेळानंतर त्यानेही मृताचे अंतिम दर्शन घेण्याची इच्छा दर्शवली. त्यावेळी वैष्णव यांना फोन करून तोही अंत्यदर्शनासाठी गेला. सुमारे  चार वाजेच्या सुमारास तक्रारदार यांची पत्नी,दोन्ही मुले हे घरी गेले तेव्हा त्यांना कोणीतरी बनावट चावीने घराचे लोखंडी चॅनल गेटसह मुख्य दार उघडून कपाटातील सुमारे ११ तोळ्याचे सोन्याचांदीचे दागिने चोरून नेल्याचे समजले. 

याप्रकरणी रात्री उशीरा सिडको ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी ,उपनिरीक्षक भरत पाचोळे, पूनम पाटील, कर्मचारी  नरसिंग पवार,राजेश बनकर, प्रकाश डोंगरे,सुरेश भिसे, स्वप्नील रत्नपारखी, किशोर गाडे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. त्यावेळी त्यांनी घरी थांबलेल्या नातेवाईकावर संशय व्यक्त केला तेव्हा तक्रारदार यांना तो मान्यच नव्हता. 

कर्ज असल्याने केली चोरी यामुळे घटनेनंतर काही दिवस पोलिसांनी गुप्तपणे तपास करून माहिती घेतली असता संशयित आरोपी हा अल्पवयीन असून तो व्यसनी आहे. त्याच्यावर मित्रकंपनीचे २६ हजार रुपये कर्ज झाले आहे. कर्जाची परतफेड करावी, याकरीता त्याचे मित्र त्याच्याकडे तगादा लावत असल्याचे कळाले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची विचारपुस केली असता सुरवातीला उडवा-उडवीची उत्तरे तो देऊ लागला.नंतर त्याने गुन्ह्याची कबुली देत त्याने ते दागिने लंपास केल्याचे सांगितले. काही दिवस स्वत:च्या बॅगेत लपवून ठेवलेले दागिने नंतर त्याने मित्राच्या घरी ठेवले होते. हे दागिने पोलिसांनी जप्त केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादtheftचोरीPoliceपोलिस