शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
2
"व्ही.के.सिंग याने कशी अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केली, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
3
धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार...
4
पश्चिम बंगालच्या निवडणुकीआधी वेगळीच खेळी; दारूच्या दुकानांबद्दल झाला मोठा निर्णय
5
महिला आरक्षण: सुप्रिया सुळेंनी CM फडणवीसांचे आव्हान स्वीकारले; म्हणाल्या, “वेळ-जागा सांगा”
6
गुरुपुष्यामृत योग २०२६: केवळ सोने खरेदीच नाही, तर आयुष्याला सोन्याची झळाळी देणारा 'गुरुपुष्य' योग!
7
नाशिक TCS प्रकरण: "लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?" चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब
8
गाडी खरेदी करताना शोरूममधूनच इन्शुरन्स घेणे बंधनकारक आहे का? काय आहे नियम?
9
जपानमध्ये ७.४ तीव्रतेचा भीषण भूकंप! उत्तर किनारपट्टीला 'सुनामी'चा तडाखा बसण्याची शक्यता; ३ मीटर उंच लाटांचा इशारा
10
प्रार्थना आणि अश्रू..., हवेत ४ तास मृत्यूशी सामना! हैदराबादहून हुबळीला जाणाऱ्या Fly91 मध्ये तांत्रिक बिघाड, सुदैवाने मोठा अनर्थ टळला!
11
एअरटेल ग्राहकांना महागाईचा शॉक! ८४ दिवसांचा प्लॅन महागला, ७९९ चा प्लॅनही हटवला; आता रिचार्जसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे
12
Bank Loan Rejection Reasons: पगार भक्कम असूनही बँक कर्ज नाकारतेय? 'या' ४ चुका ठरू शकतात कारणीभूत!
13
Sade Sati: साडेसातीचा विळखा की परिवर्तनाची संधी? मेष, कुंभ आणि मीन राशींसाठी आगामी काळ कसा असेल?
14
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
15
शेवटची इच्छा पूर्ण! 'स्वरस्वामिनी' आशा भोसले यांच्या अस्थींचे पवित्र गंगेत विसर्जन
16
इराण चर्चेसाठी पाकिस्तानात जाणार की नाही? इब्राहीम अजीजी म्हणाले, "प्रत्येक अट स्वीकारली जाणार नाही"
17
IPL 2026: रोहित शर्मा सलग दुसऱ्या सामन्यालाही मुकणार? GT vs MI मॅचआधी आली महत्त्वाची अपडेट
18
Latest Marathi News LIVE Updates: खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागण्या काय?
19
पश्चिम बंगालमध्ये ७ लाख नवीन मतदारांची भर; आगामी निवडणुकीत राजकीय गणिते बदलणार?
20
अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे यांच्या स्वागताला विमानतळावर मोजकेच कार्यकर्ते

By admin | Updated: November 26, 2014 01:12 IST

औरंगाबाद : आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी मंगळवारी शहरात दाखल झालेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ऐनवेळी त्यांचा मुक्काम सुभेदारी

औरंगाबाद : आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी मंगळवारी शहरात दाखल झालेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ऐनवेळी त्यांचा मुक्काम सुभेदारी विश्रामगृहावरून जालना रोडवरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये केला. दरम्यान, ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त त्यांचे विमानतळावर स्वागत करण्यासाठी केवळ साठ- सत्तर कार्यकर्ते उपस्थित होते. राज ठाकरे यांचे सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास विमानतळावर आगमन झाले. तेथे जमलेल्या शहर आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी घोषणाही दिल्या. त्यानंतर राज ठाकरे पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामासाठी गेले. नेहमी पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्काम ठोकणारे राज यांचा सुभेदारी विश्रामगृहावर मुक्काम असल्याचे आधी जाहीर झाल्याने सामान्य कार्यकर्त्यांमध्येही समाधानाचे वातावरण होते. कार्यकर्त्यांनी आधी नियोजन केल्याप्रमाणे सुभेदारी शासकीय विश्रामगृह बुक करण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी हा मुक्काम रद्द करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २७ रोजी दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी औरंगाबादेत येत असल्याने ठाकरे यांनी आपला मुक्काम तेथून हॉटेलमध्ये नेल्याचे कार्यकर्त्यांनी बोलून दाखविले.