शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

ग्रामीण रोजगार हमीवर महाराष्ट्रात अत्यल्प खर्च; बिहार, छत्तीसगडसुद्धा पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2019 7:44 PM

खर्च व्हायला हवे होते ५ हजार कोटी... झाले १,६०० कोटी

ठळक मुद्देराजस्थान, बिहार, छत्तीसगड व मध्यप्रदेश पुढे ग्रामरोजगारसेवकास महाराष्ट्रात तुटपुंज्या मानधनावर कामएका कुटुंबाला जेमतेम ४५ दिवस रोजगार

- स.सो. खंडाळकर 

औरंगाबाद : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवर महाराष्ट्रात केंद्र सरकारची अत्यल्प रक्कम खर्च होत असून, त्यातला ग्रामरोजगारसेवक, तर वाऱ्यावरच सोडून दिला की काय, अशी परिस्थिती आहे. राजस्थान, बिहार, छत्तीसगड, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये हा ग्रामरोजगारसेवक चांगला पगार घेत असताना महाराष्ट्रात मात्र तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहे. त्या-त्या ग्रामसभांनी ग्रामरोजगारसेवक म्हणून नियुक्त केलेले ठराव सोबत घेऊन तो काम करीत असून, त्याच्याकडे शासनाचे कोणतेही नियुक्तीपत्र नाही.

केंद्र शासनाने नियुक्त करून दिलेल्या १०० दिवसांपेक्षा जास्त रोजगाराची रक्कम राज्य शासनास अदा करावी लागते. मागील वर्षात निर्माण झालेल्या ९ कोटी मनुष्य दिवसांपैकी जवळपास तीन कोटी मनुष्य दिवस हे १०० पेक्षा जास्त दिवस काम केलेल्या मजुरांचे आहेत. म्हणजेच राज्यास केवळ मजुरीसाठी ६०० कोटी व आनुषंगिक साहित्यासाठी जवळपास ४०० कोटी याप्रमाणे १,००० कोटी रुपये राज्य रोहयोतून उपलब्ध करून द्यावे लागलेले आहेत. 

या योजनेतील बेरोजगार भत्त्याची कुठेच अंमलबजावणी झालेली नाही. काम नसल्यास संबंधित मजुरास ५० टक्केम्हणजे २०६ रुपयांच्या अर्धी रक्कम १०३ रुपये बेरोजगार भत्ता म्हणून देणे भाग आहे; परंतु महाराष्ट्रात कुठेच असा भत्ता दिला जात नसल्याचे उघड होत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना केंद्र पुरस्कृत असून, ती महाराष्ट्रातल्या रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर राबविण्यात येत आहे. या योजनेवर महाराष्ट्रात खूपच कमी रक्कम खर्च होण्यास विविध कारणे असली तरी ग्रामरोजगारसेवकांचे यातले आकर्षण संपले असल्याने या योजनेच्या अंमलबजावणीस खीळ बसण्याची शक्यता आहे. ग्रामरोजगारसेवकांना उचित  किंवा निश्चित मानधन देण्याकडे शासन सतत दुर्लक्ष करीत आहे. 

एका कुटुंबाला जेमतेम ४५ दिवस रोजगारमागील वर्षी नऊ कोटी मनुष्य दिवस निर्मिती झालेली असून, दोन लक्ष मजूर कुटुंबांनी कामाची मागणी केली आहे. म्हणजे ४५ दिवस एका कुटुंबाला रोजगार उपलब्ध करून देण्यात राज्य यशस्वी ठरलेले आहे.असे असले तरी केंद्र शासनाची किमान शंभर दिवसांची हमी लक्षात घेता या कामांमध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ करण्यास वाव आहे. ग्रामरोजगारसेवकांच्या अत्यंत न्याय्य मागण्यांकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे महाराष्ट्रात या योजनेचे भवितव्य धोक्यात आले असल्याचे दिसून येते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकारfundsनिधी