शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

इज्तेमाच्या संयोजकांनी जिंकले अथांग जनसागराचे मन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 13:10 IST

औरंगाबाद शहराच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिल्या जाणारा आणि अनेक विक्रम मोडणार्‍या राज्यस्तरीय इज्तेमाचा सोमवारी समारोप झाला.

ठळक मुद्देमहाराष्ट्रासह देश-विदेशातून आलेल्या लाखो साथींना उच्च प्रतीच्या सुविधा देण्याचे काम संयोजकांनी केले. साथींना कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू दिली नाही.

औरंगाबाद : औरंगाबाद शहराच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिल्या जाणारा आणि अनेक विक्रम मोडणार्‍या राज्यस्तरीय इज्तेमाचा सोमवारी समारोप झाला. महाराष्ट्रासह देश-विदेशातून आलेल्या लाखो साथींना उच्च प्रतीच्या सुविधा देण्याचे काम संयोजकांनी केले. साथींना कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. संयोजकांनी या आदरातिथ्याने उपस्थित लाखो साथींची मनेही जिंकली.

एवढ्या मोठ्या प्रमाणात येणार्‍या नागरिकांच्या राहण्याची, जेवण, अंघोळ आदी व्यवस्था कशा पद्धतीने केली यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता संयोजन समितीच्या सदस्यांनी नमूद केले की, मागील सहा महिन्यांपासून जमीन ताब्यात घेणे, सपाटीकरण आदी कामे सुरू केली. शेतकर्‍यांचा कापूस वेचण्यासाठी महिला सापडत नव्हत्या. आजपासच्या गावांमध्ये आवाहन करून तब्बल एक हजार मुस्लिम महिलांनी पुढाकार घेऊन संपूर्ण कापसाची वेचणी करून दिली.

आमीर साहब यांनी प्रत्येक जिल्ह्याला कामांची वाटणी करून दिली होती. त्यानुसार संबंधित जिल्ह्यातील जबाबदार लोक रात्रंदिवस काम करीत होते. २ हजार एकर परिसरात तब्बल २१ विहिरी होत्या. या विहिरींचे पाणी एका मोठ्या शेततळ्यात आणून टाकले. १ कोटीपेक्षा अधिक क्षमतेची आठ मोठी शेततळी उभारली. पाणी शुद्धीकरणासाठी संप उभारण्यात आले. वजूखाने, शौचालये, बाथरूमची संख्या जवळपास ५० हजरांपेक्षा जास्त होती. संपूर्ण वीजव्यवस्थेची जबाबदारी चिकलठाणा येथील सद्गृहस्थाने घेतली. 

नांदेड येथील तज्ज्ञ वास्तुविशारदाने संपूर्ण ड्रॉर्इंग तयार करून दिले. इज्तेमास्थळी तब्बल ५० कि.मी.च्या अंतर्गत पाण्याच्या लाईन टाकण्यात आल्या. ड्रेनेजव्यवस्थाही वेगळी करण्यात आली. अंघोळ, हातपाय धुण्यासाठी वापरण्यात आलेल्या पाण्याची वेगळी व्यवस्था करून ते परिसरात जिरविण्यात आले. त्यामुळे या भागातील विहिरींच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. मुख्य मंडप ९१ लाख चौरस फुटांचा ठेवण्यात आला. त्यात ऐनवेळी वाढ करून तो १ कोटी ५ लाख चौरस फूट करण्यात आला. इज्तेमा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला हा निर्णय घेण्यात आला. 

ऐहतेकाफ, रोजेइज्तेमा यशस्वीतेसाठी ‘दुआ’ करण्यात काही साथी २४ तास मग्न होते. १७ साथी मुख्य मंडपात ऐहतेकाफमध्ये बसले होते. प्रत्येक जिल्ह्याच्या मंडपात ५ साथी ऐहतेकाफ आणि रोजे ठेवून होते. मागील तीन महिन्यांपासून ही त्यांची दिनचर्या होती.

विदेशी नागरिकांसाठी ए.सी. कक्षमुख्य मंडपापासून हाकेच्या अंतरावर आंतरराष्ट्रीय साथींसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला होता. ३ हजार साथी थांबतील, अशी व्यवस्था तिथे होती. येथील कक्ष वातानुकूलित तयार केले होते. राज्यभरातून आलेल्या काही व्हीआयपी साथींसाठी कूलरसह बाजूलाच कक्ष केला होता.

पंढरपूर ट्रस्टचे पदाधिकारी आलेसोलापूर येथील पंढरपूर ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांनी तीन दिवसांपूर्वीच इज्तेमास्थळी हजेरी लावली. दरवर्षी पंढरपुरात लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होतात. इज्तेमाप्रमाणे आम्हालाही सोयी-सुविधा देता येऊ शकतील का, याचा आढावा त्यांनी घेतला. संपूर्ण इज्तेमा स्थळ फिरून त्यांनी पाहणी केल्याचे संयोजकांनी सांगितले.

टॅग्स :Ijtema Aurangabad 2018इज्तेमा औरंगाबाद २०१८