शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन विभागाने लपविले कोट्यवधींचे दायित्व

By admin | Updated: August 18, 2014 00:38 IST

औरंगाबाद : सिंचन विभागाने २४ कोटी रुपयांचे दायित्व निर्माण केल्याचा गौप्यस्फोट मुख्य वित्त व लेखाधिकारी उत्तम चव्हाण यांनी शनिवारी (दि.१६) स्थायी समितीच्या बैठकीत केला.

औरंगाबाद : सिंचन विभागाने २४ कोटी रुपयांचे दायित्व निर्माण केल्याचा गौप्यस्फोट मुख्य वित्त व लेखाधिकारी उत्तम चव्हाण यांनी शनिवारी (दि.१६) स्थायी समितीच्या बैठकीत केला. वारंवार मागणी करूनही सिंचन विभागाने अद्यापही पूर्ण माहिती दिली नसल्याचे त्यांनी यावेळी सभागृहासमोर स्पष्ट केले. सिंचनाच्या काम वाटपावरून गेल्या काही दिवसांपासून सिंचन विभागातील अनियमितता समोर आली आहे. स्थायी समितीच्या शनिवारी झालेल्या बैठकीत अनिलकुमार चोरडिया यांनी हा विषय उपस्थित करून सिंचन विभागाने गेल्या वर्षभरात मंजूर केलेली सर्वच कामे रद्द करण्याची मागणी केली. सिंचन विभागाच्या दायित्वाबद्दल त्यांनी विचारणा केल्यावर कॅफो चव्हाण म्हणाले, सिंचन विभागाने अनेक कामांची माहिती अर्थ विभागाला दिलेलीच नाही. प्रशासकीय मंजुरी देण्यापूर्वी प्रत्येक संचिका वित्त विभागाकडून मंजूर होऊन जाणे अपेक्षित असताना सिंचन विभागाने वित्त विभागाकडे संचिका न पाठविताच कामाला मंजुरी दिली. ही कामे पूर्ण झाल्यानंतर त्याची बिले फक्त वित्त विभागाकडे सादर केली जातात व ती बिले वित्त विभागाला मंजूर करणे अपरिहार्य आहे. चव्हाण म्हणाले, न्यायप्रविष्ट असलेल्या ९ कोटींच्या कामांसह सिंचन विभागाचे दायित्व २४ कोटी रुपयांचे असून, अद्याप त्यांच्याकडे ५ कोटी ५० लाख रुपयांची कामे टेंडरसाठी पडून आहेत. असे असताना सिंचन विभागाने चालू वर्षाचे ८९ लाख रुपयांचे दायित्व दर्शवून खोटी माहिती पुरविली आहे. पाझर तलावात या वर्षासाठी ५ कोटींचे नियोजन होणे आवश्यक असताना ७ कोटी रुपयांचे झाले आहे. त्यामुळे आपण संचिकांना मान्यता देणे सध्या रोखले आहे. शारदा जारवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला उपाध्यक्षा विजया निकम, सभापती रामनाथ चोरमले, शिक्षण सभापती बबन कुंडारे, दीपक राजपूत, अलका पळसकर, रामदास पालोदकर, सीईओ चौधरी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळुंके आदींची उपस्थिती होती.