मध्यरात्री अग्नितांडव; ६ जणांचा कोळसा! छत्रपती संभाजीनगरच्या एमआयडीसीतील कारखान्याला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 06:33 AM2024-01-01T06:33:53+5:302024-01-01T06:34:39+5:30

दोन चिमुकल्यांसह नऊ जण या आगीतून बचावले. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Midnight Fire; Coal of 6 people A massive fire broke out at a factory in Chhatrapati Sambhajinagar's MIDC | मध्यरात्री अग्नितांडव; ६ जणांचा कोळसा! छत्रपती संभाजीनगरच्या एमआयडीसीतील कारखान्याला भीषण आग

मध्यरात्री अग्नितांडव; ६ जणांचा कोळसा! छत्रपती संभाजीनगरच्या एमआयडीसीतील कारखान्याला भीषण आग

वाळुज महानगर (जि. छत्रपती संभाजीनगर) : वाळुज उद्योगनगरीतील सनशाइन एंटरप्रायजेस कंपनीला शनिवारी मध्यरात्री १ वाजता लागलेल्या आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. दोन चिमुकल्यांसह नऊ जण या आगीतून बचावले. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वाळुज उद्योगनगरीत साबेरखान शब्बीरखान पठाण (रा. बायजीपुरा) यांची सनशाइन एंटरप्रायजेस कंपनी आहे. तेथे हातमोजे तसेच इतर साहित्य बनविण्याचे काम केले जाते. हसीनोमुद्दीन मुस्ताक शेख हे ठेकेदार असून, ते कुटुंबीय व कामगारांसह कंपनीतच वास्तव्यास होते.

श्वानांमुळे आली जाग
आग लागल्यानंतर परिसरातील श्वान जोरजोरात भुंकू लागले. त्यामुळे हसीनोमुद्दीन यांच्या पत्नींना जाग आली. त्यांनी आरडाओरड केल्याने वरच्या मजल्यावर झोपलेले कामगार जागे झाले. परंतु शटर बंद ते सर्वजण आतमध्येच अडकून पडले.

मुख्यमंत्र्यांकडून मदत 
वाळूज येथील आगीच्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शोक व्यक्त केला. तसेच मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच जखमी कामगारांवर शासकीय खर्चातून उपचार करण्याच्याही सूचना दिल्या.

Web Title: Midnight Fire; Coal of 6 people A massive fire broke out at a factory in Chhatrapati Sambhajinagar's MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.