एमआयडीसी वाळूज पोलीस : जीवे मारण्याची धमकी देत नराधमाचा विवाहितेवर बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 21:04 IST2017-12-24T21:04:18+5:302017-12-24T21:04:41+5:30
दोन चिमुकल्यांसह घरात एकटी झोपलेल्या विवाहितेसह तिच्या बाळांना जीवे मारण्याची धमकी देत, एका नरधमाने अत्याचार केला. ही खळबळजनक घटना शनिवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास रांजणगाव शेणपुंजी येथे घडली.

एमआयडीसी वाळूज पोलीस : जीवे मारण्याची धमकी देत नराधमाचा विवाहितेवर बलात्कार
औरंगाबाद - दोन चिमुकल्यांसह घरात एकटी झोपलेल्या विवाहितेसह तिच्या बाळांना जीवे मारण्याची धमकी देत, एका नरधमाने अत्याचार केला. ही खळबळजनक घटना शनिवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास रांजणगाव शेणपुंजी येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात नराधमाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी तडकाफडकी कारवाई करीत आरोपीला बेड्या ठोकल्या.
दादासाहेब घाडगे(रा. रांजणगाव शेणपुंजी)असे अटकेतील नराधमाचे नाव आहे.याविषयी अधिक माहिती देताना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार २५ वर्षीय विवाहिता रांजणगाव येथे पती आणि दोन चिमुकल्यासह भाड्याने राहतात. आरोपी हा पीडितेच्या घराशेजारी असलेल्या मंडपवाल्याकडे काम करतो. पीडितेच्या लहान मुलांना तो खेळवत असत यामुळे पीडितेसोबत त्याची चार ते पाच वर्षापासून ओळख होती. शनिवारी रात्री पीडितेचा पती कंपनीत कामाला गेल्याने ती मुलांबाळासह घरात एकटीच झोपली होती. रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास आरोपीने पीडितेचे दार वाजविले. पती ड्युटीवरून आला असेल, असे समजून पीडितेने दार वाजविताच आरोपीने तिला ढकलून देत प्रथम दाराची कडी आतून लावून घेतली. यावेळी त्याने एका हाताने पीडितेचे तोंड तर दुसºया हाताने गळा दाबून त्याने तिला आणि तिच्या चिमुकल्यांना जीवे मारण्याची धमकी देत गप्प राहण्याचे सांगितले. नराधम आपले अथवा दोन्ही चिमुकल्यांचे बरेवाईट करील या भितीपोटी ती गप्प राहिली. यावेळी त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्याचवेळी पीडितेचा पती ड्युटीवरून घरी परतला तेव्हा दाराची कडी उघडून तो पाणी पिण्यासाठी आलो होतो,असे सांगून तेथून पळून गेला. यानंतर पीडितेने घडलेली घटना पतीला सांगितली. तिच्या नातेवाईकांनी तिला धीर देत आज सकाळी तिला एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात घेऊन आले. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकारी, कर्मचाºयांनी पीडितेची तक्रार नोंदवून घेतली. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी आरोपी दादासाहेब घाडगे यास अटक केले,अशी माहिती पोलीस निरीक्षक साबळे यांनी दिली.