छत्रपती संभाजीनगर : पडेगाव व मिटमिटा परिसरातील विविध वसाहतींत नागरिकांनी मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी केल्याचे प्रकार महावितरणच्या धडक मोहिमेत उघड झाले. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
सहायक अभियंता प्रदीप निकम व त्यांचे सहकारी पडेगाव, अन्सार कॉलनीत तपासणी मोहिमेसाठी गेले असता काही जण मीटरमध्ये छेडछाड करून अनधिकृतपणे वीज वापर करताना आढळले. एजाज अहेमद अब्दुल वहाब शेख याने ७५ हजार ८४६, असदखान रसूलखान पठाण याने ७१ हजार ७७०, समीना बेगम मिर्झा रियाझ बेगम हिने ५७ हजार ३७०, शेख फक्रुद्दिन शेख बद्रोद्दिन याने ५७ हजार ७०५, साफिया बेगम अश्फाक हिने ५१ हजार १५२, नसीम बेगम गुलाम हुसेन कुरेशी हिने ५० हजार ५७२ व सबा नाझ ताजोद्दिन पाशा हिने ४८ हजार १२० रुपये या ७ जणांनी ४ लाख १२ हजार ५३५ रुपयांची वीजचोरी केली, असे फिर्यादीत म्हटल्याची माहिती महावितरणने दिली.
दुसऱ्या प्रकरणात गुलशन कॉलनीतील शेख खाजा शेख जाफर याने ३८ हजार १३९, शादाबनगर, मिटमिटा येथील शेख शहाजान अब्दुल मुजाहेद याने ४५ हजार ४६, मिटमिटा येथील अकिला गौस सय्यद हिने ३ हजार २७८, पडेगावातील अमीन शहा याने १ लाख २१ हजार ६७७, शहानगरमधील शेख रशीद शेख मोहंमद याने १७ हजार १८४, पडेगावातील शेख इफ्तेकार शेख इब्राहीम याने १४ हजार ५०७, शहा कॉलनीतील नामोद्दिन मोइनुद्दिन शेख याने ५ हजार ३२३ व शेख जिलानी याने ८ हजार २२२ या ८ जणांनी २ लाख ५३ हजार ३७६ रुपयांची वीजचोरी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
वीजचोरीची बिले व दंड भरण्यास टाळाटाळया सर्वांना वीजचोरीची निर्धारित बिले व दंड आकारण्यात आला. मात्र ते भरण्यास टाळाटाळ केली म्हणून सहायक अभियंता प्रदीप निकम यांच्या फिर्यादीवरून या १५ जणांवर छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती महावितरणने दिली.
Web Summary : In Chhatrapati Sambhajinagar, 15 individuals were booked for electricity theft after meter tampering was discovered during a raid. They evaded paying bills and penalties, leading to police action for stealing electricity worth lakhs.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर में बिजली चोरी का मामला सामने आया है, जहाँ मीटर से छेड़छाड़ करते हुए 15 लोगों को पकड़ा गया। बिल और जुर्माना न भरने पर लाखों की बिजली चोरी के आरोप में पुलिस ने मामला दर्ज किया।