शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याचा पारा ४3 अंशावर

By admin | Updated: May 28, 2014 00:41 IST

हिंगोली : मागील आठवड्यात तीन-चार वेळेस पाऊस आल्याने नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला होता. सध्या या आठवड्यात सुर्य आग ओकू लागल्याने जिल्ह्याच्या तापमानाचा पारा मंगळवारी ४३ अंशावर गेला.

हिंगोली : मागील आठवड्यात तीन-चार वेळेस पाऊस आल्याने नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला होता. सध्या या आठवड्यात सुर्य आग ओकू लागल्याने जिल्ह्याच्या तापमानाचा पारा मंगळवारी ४३ अंशावर गेला. दुपारी वारा कमी होताच उकड्याने नागरिकांचे हाल झाले. उन्हाळ्यातील प्रत्येक आठवड्यात हलक्या का होईना पावसाने हजेरी लावली आहे. आता पावसाळा जवळ येत असताना उन्हाची तिव्रत्ता वाढत आहे. मागील दोन दिवसांत अधिक उन असल्याने नागरिकांचे हाल झाले. रविवारी ४२ अंशावर पारा गेला होता. उन्हामुळे दुपारी घराबाहेर पडणे नागरिकांनी टाळल्याने रस्ते निर्मनुष्य झाले होते. दिवसभर कडक उन पडल्यानंतर तापमान कमी होताच साडेतीन वाजेच्या दरम्यान जोरदार वारा सुटला. जवळपास १० ते १५ मिनीटे वारा वाहिल्यानंतर हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. त्यानंतर रात्री १२ वाजेच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुटला. जवळपास १० मिनीटे या वार्‍याने धावपळ उडाली. सोमवारी तापमानाचा पारा एक अंशाने घसरल्याने ४१ अंश कमाल तापमानाची नोंद करण्यात आली होती. मंगळवारी सकाळपासून सुर्याने आग ओकण्यास सुरूवात केली. दुपारी तापमानात आणखीच भर पडून कमाल तापमानाचा पारा ४३ अंशावर गेला. त्यामुळे दुपारी शहरातील अनेक दुकाने बंद होती. बसस्थानकात गर्दी दिसून आली नाही. किमान तापमानाची नोंद ३० अंश सेल्सिअसची झाली. मंगळवारप्रमाणे बुधवारी देखील तापमान कायम राहण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)