मंत्रालयीन कक्ष अधिका-यांची ‘लोकमत’ला भेट, जाणून घेतले वृत्तपत्र छपाईचे कामकाज  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 04:07 AM2018-02-03T04:07:59+5:302018-02-03T04:08:23+5:30

मुंबई येथील मंत्रालयातील विविध विभागांतील कक्ष अधिका-यांनी प्रशिक्षणांतर्गत वृत्तपत्र छपाईचे कामकाज कशा पद्धतीने चालते, हे जाणून घेण्यासाठी बुधवारी (दि. ३१) ‘लोकमत भवन’ आणि शेंद्रा प्रेस येथे भेट दिली.

Meeting of the Ministerial Cell Officers 'Lokmat', the work of the newspaper printing | मंत्रालयीन कक्ष अधिका-यांची ‘लोकमत’ला भेट, जाणून घेतले वृत्तपत्र छपाईचे कामकाज  

मंत्रालयीन कक्ष अधिका-यांची ‘लोकमत’ला भेट, जाणून घेतले वृत्तपत्र छपाईचे कामकाज  

googlenewsNext

औरंगाबाद - मुंबई येथील मंत्रालयातील विविध विभागांतील कक्ष अधिका-यांनी प्रशिक्षणांतर्गत वृत्तपत्र छपाईचे कामकाज कशा पद्धतीने चालते, हे जाणून घेण्यासाठी बुधवारी (दि. ३१) ‘लोकमत भवन’ आणि शेंद्रा प्रेस येथे भेट दिली. या वेळी वृत्तपत्र छपाई, वितरण आदींसंदर्भातील कामकाज कक्ष अधिका-यांनी जाणून घेतले.
मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, नाथनगर (पैठण, जि. औरंगाबाद) यांच्या वतीने शासनाच्या विविध खात्यांमधील कर्मचारी-अधिकाºयांना गरजेनुसार प्रशिक्षण देण्यात येते. १२ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत मंत्रालयातील विविध विभागांतील कक्ष अधिकारी येथे आले आहेत. या प्रशिक्षणांतर्गत वृत्तपत्र छपाईचे कामकाज जाणून घेण्यासाठी त्यांनी लोकमत भवन आणि शेंद्रा प्रेस येथे भेट दिली. या वेळी ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते उपस्थित कक्ष अधिकाºयांचा सत्कार करण्यात आला. या वेळी मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी येथील तहसीलदार तथा सत्र संचालक शारदा चौंडेकर - शंकरवार, नायब तहसीलदार समी खान हेदेखील उपस्थित होते.
सर्व कक्ष अधिकाºयांनी शेंद्रा प्रेस येथे वृत्तपत्र छपाईचे कामकाज कसे चालते, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. या वेळी उपमहाव्यवस्थापक - निर्मिती सुरेश महाजन, व्यवस्थापक - मेंटेनन्स प्रशांत गीते, उपमहाव्यवस्थापक हेमंत ठाकूर आदींनी आपले वृत्तपत्र अग्रगण्य असून, अत्याधुनिक व अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साह्याने वृत्तपत्राची छपाई कमीतकमी वेळेत पूर्ण करून वितरण कसे करण्यात येते, याची प्राथमिक माहिती कक्ष अधिकाºयांना दिली.
या वेळी मंत्रालयातील कक्ष अधिकारी शि. जि. पुरव (ग्रामविकास जलसंधारण विभाग), अ. अ. मून (पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग), ऐ. नि. गोवेकर (मराठी भाषा विभाग), प्रा. वि. माईनकर , अ. अ. पटवर्धन, यो. रा. गावठे, शु. सं. घाग, शो. सी. गायकवाड (वित्त विभाग), अ. वा. बोरवणकर (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग), ग. स. कदम (सामान्य प्रशासन विभाग), मा. वि. ढमाले (महसूल व वन विभाग), सं. ब. जाधव (नगरविकास विभाग), व्य. श्री. जिठ्ठा (जलसंपदा विभाग), मे. दे. कांदळकर (अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग), वै. अ. काकडे (अल्पसंख्याक विकास विभाग), सी. तु. सावंत (गृहविभाग), रु. स. कबरे (गृह विभाग), वै. दि. सरदेसाई (नियोजन विभाग), मा. म. साठे (महसूल व वन विभाग), सं. रा. श्रॉफ (नियोजन विभाग), वै. प्र. वर्तक (जलसंपदा विभाग), रा. उ. बापट (मराठी विभाग), वि. म. डिसोझा (अल्पसंख्याक विकास विभाग) हे उपस्थित होते. या सर्व कक्ष अधिकाºयांना ‘लोकमत’ची वाटचाल कशा प्रकारे सुरू आहे, याबाबत आॅडिओ-व्हिडीओद्वारे प्रेझेंटेशन दाखविण्यात आले. शारदा चौंडेकर - शंकरवार यांनी आभार मानले.

Web Title: Meeting of the Ministerial Cell Officers 'Lokmat', the work of the newspaper printing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.