शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टरसाठी बैठक

By admin | Updated: August 21, 2014 00:12 IST

औरंगाबादेतही इलेक्ट्रॉनिक क्लस्टर उभारणीसाठी आज सीएमआयए या औद्योगिक संघटनेच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली.

औरंगाबाद : इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात विदेशी कंपन्यांचा वाढलेला दबदबा लक्षात घेता दोन वर्षांपूर्वीच केंद्र शासनाने देशभरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करणाऱ्या कंपन्यांना चालना देण्यासाठी तब्बल ५० ठिकाणी क्लस्टर तयार करण्याचा निर्णय घेतला. औरंगाबादेतही इलेक्ट्रॉनिक क्लस्टर उभारणीसाठी आज सीएमआयए या औद्योगिक संघटनेच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली.इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करणाऱ्या मायक्रो, स्मॉल आणि मीडियम एटरप्राईजेसच्या कंपन्यांना शासन लॅब टेस्टिंग आणि एक्सपोर्ट प्रमाणपत्रासाठी येणारा खर्च देईल. त्याचप्रमाणे उद्योजकांना एकाच छताखाली लहान-मोठ्या अत्याधुनिक सोयी-सुविधा मिळाव्यात म्हणून क्लस्टर उभारण्यात येणार आहे.दरम्यान, आज चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चर (सीएमआयए) कार्यालयात अध्यक्ष मुनीष शर्मा, माजी अध्यक्ष मिलिंद कंक, उपाध्यक्ष आशिष गर्दे यांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्यात आली. बैठकीत आयएसएचे उपाध्यक्ष केतुल आचार्य, श्रावणी शर्मा यांनी योजनेचे स्वरूप आणि व्याप्ती विशद केली. एकूण ५० कोटींच्या या प्रकल्पात सुमारे १.६ एकर जागा किमान आवश्यक आहे. पन्नास कोटींमध्ये उद्योजकांना १५ टक्के वाटा टाकावा लागेल. क्लस्टरसाठी अर्ज करण्याच्या नियमावलीत किमान सात उद्योजकांचा एक संच असावा, ही महत्त्वपूर्ण अट आहे. क्लस्टरची औरंगाबादला किती गरज आहे, याचे सर्वेक्षण करण्यात येईल. सहा महिन्यांत ही सर्व प्रकिया पार पाडावी लागेल. कन्सल्टंट विलास रबडे यांनी योजनेचे फायदे थोडक्यात नमूद केले.बैठकीस शहरातील वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रतिनिधी, उद्योजक, लघु उद्योजक, शासकीय संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तज्ज्ञांनी उद्योगांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली.