मध्यम, लघु प्रकल्प कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2016 00:28 IST2016-07-04T00:07:44+5:302016-07-04T00:28:59+5:30

लातूर : जिल्ह्यात आतापर्यंत १५४़२ मि़मी़ पाऊस झाला असला तरी मध्यम व लघू प्रकल्प कोरडेठाक आहेत़ मृत साठ्यातही वाढ झालेली नाही़

Medium, Small Project Corridor | मध्यम, लघु प्रकल्प कोरडेठाक

मध्यम, लघु प्रकल्प कोरडेठाक


लातूर : जिल्ह्यात आतापर्यंत १५४़२ मि़मी़ पाऊस झाला असला तरी मध्यम व लघू प्रकल्प कोरडेठाक आहेत़ मृत साठ्यातही वाढ झालेली नाही़ २ मोठे, ८ मध्यम प्रकल्प व १३१ लघू प्रकल्प अशा एकूण १४१ प्रकल्पामध्ये अद्याप पाणीसाठा झालेला नाही़ निम्न तेरणा या मोठ्या प्रकल्पात १़६१९ दलघमी मृतसाठा उपलब्ध आहे़ मध्यम प्रकल्पातील आठ पैकी देवर्जन, साकोळ, घरणी या तीन प्रकल्पात किंचित मृतसाठा आहे़ अन्य प्रकल्प अद्यापही तहानलेले असून, हे प्रकल्प भरण्यासाठी मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत़
लातूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून आवर्षणग्रस्त परिस्थिती असल्यामुळे दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे़ तसेच पाणीपातळीही दिवसेंदिवस घटत चालली आहे़ परंतू, नुकत्याच झालेल्या पावसामुळे पाणीपातळीत वाढ होईल, अशी अपेक्षा असतानाही १५४़२ मि़मी़ पाऊस होऊनही प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली नाही़ मोठ्या प्रकल्पातील मांजरा प्रकल्पामध्ये मृतसाठाही उपलब्ध नाही़ तर निम्न तेरणा प्रकल्पामध्ये १़६१९ दलघमी मृतसाठा उपलब्ध आहे़ तर ८ मध्यम प्रकल्पापैकी देवर्जन मध्यम प्रकल्पामध्ये ०़६१३, साकोळ ०़५७६ तर घरणी प्रकल्पामध्ये ०़७७३ याप्रमाणे तीन प्रकल्पामध्ये मृतसाठा उपलब्ध आहे़ तर तावरजा रेणापूर व्हटी, मसलगा, तिरू याप्रकल्पामध्ये मात्र पाणीच नसल्याने हे प्रकल्प कोरडे पडले आहेत़ तर इतर लघू पाटबंधारे विभागाच्या १३१ प्रकल्पांमध्ये ४़७७६ मृतसाठा उपलब्ध आहे़ तर उपयुक्त पाणीसाठा १़९५९ एवढा उपलब्ध आहे़ एकूण पाण्याची सरासरी पाहता लघू पाटपंधाऱ्याच्या प्रकल्पामध्ये ०़६५ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे़ जिल्ह्यातील दोन मोठे, आठ मध्यम व १३१ लघु पाटबंधारे अशा एकूण १४१ प्रकल्पांमध्ये ७़८०० मृतसाठा उपलब्ध आहे़ तर १़९५९ एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे़ सरासरी ०़२८ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे़ (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे़ भर पावसाळ्यातही जिल्ह्यातील टंचाईचा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा होती तरीही जूनमध्येही ८१७ गावांमध्ये १३५४ अधिग्रहणे तर २०० गावांमध्ये ३२६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे़ त्यातच जुन्या ऐतिहासिक विहिरीच्या पाणीपातळीतही किंचितही वाढ झालेली नाही़ दरम्यान, गेल्या १० वर्षाच्या तुलनेत पहिल्यांदाच २़६९ मीटरने पाणीपातळीत घट आहे़ मे २००९ मध्ये अहमदपूर १०़६०, औसा ११़३६, चाकूर ९़३०, लातूर ९़५४, निलंगा १०़८७, शिरूर अनंतपाळ ११़९०, रेणापूर ८़८५, उदगीर ११़८०, जळकोट ११़५२, देवणी ७़९० या प्रमाणात सरासरी १०़३५ मीटर पाणीपातळी होती़
लातूर शहरात १५५ आणि ग्रामीण भागात २०० गावात ३२० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ ८१७ गावामध्ये १३५४ अधिग्रहण करण्यात आले आहेत़ या अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ गतवर्षी जून महिन्यात पडलेल्या पावसापेक्षा यंदाच्या जूनमध्ये अधिक पाऊस पडला आहे़ तरीही स्त्रोत कोरडे आहेत़ जिल्ह्यात सर्वदूर सारखा पाऊस झाला नसल्यामुळे ही स्थिती आहे़ त्यामुळे पावसाळ्यातही टँकरद्वारेच पाणीपुरवठा करण्यात येत आहे़

Web Title: Medium, Small Project Corridor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.