शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

हल्ला प्रकरणी माजलगावात निदर्शने

By admin | Updated: August 4, 2014 00:49 IST

माजलगाव : भोई समाजावरील महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात भारिप बहुजन महासंघाच्या वतीने येथील शिवाजी चौकात रविवारी निदर्शने करण्यात आली

माजलगाव : भोई समाजावरील महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात भारिप बहुजन महासंघाच्या वतीने येथील शिवाजी चौकात रविवारी निदर्शने करण्यात आली तर शिवसेना, भाजपा, मराठा सेना व आव्हाण संघटना यांच्याकडून सदरील घटनेचा निषेध करण्यात आला. माजलगाव येथील कॅम्प परिसरात महिला पुरुष मच्छीमारांवर माजलगाव धरणाच्या ठेकेदाराच्या गुंडानी शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हल्ला केला. यात एका गर्भवती महिलेच्या पोटावर गुंडानी लाथा मारल्या होत्या. त्यामुळे पोटातील बाळाचा गर्भातच मृत्यू झाला आहे. तिच्यावर जिल्हा रुग्णालया उपचार सुरु आहेत. माजलगाव येथील ठेकेदार माणिकशहा याने पाठविलेल्या गुंडाने शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास महिला व पुरषांना मारहाण केली. राधा गणेश लिंबोर या गर्भवती महिलेच्या पोटावर गुंडानी जबर मारहाण केली होती. मारहाणीमुळे त्या महिलेचा गर्भ पोटातच दगावला. तिच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.या घटनेमुळे सामाजिक संघटनांमध्ये संतापाची लाट उसळी आहे. या भारिपच्या वतीने निदर्शने करण्यात आली. ठेकेदाराबरोबरच पोलीस निरीक्षक अन्वर खान पठाण हे दोषी आहेत. त्यामुळे पीआय अन्वर खान व एपीआय देवकर यांना या प्रकरणी सह आरोपी करावे, सर्व आरोपिंना तात्काळ अटक करावी यासह विविध मागण्या केल्या. घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.शिवसेनेचे युवाध्यक्ष दत्ता रांजवण, मराठा सेनेचे कालीदास सोळंके यांच्यासह अन्य संघटनांनी या मारहाणीचा निषेध पत्रकान्वये केला आहे. दरम्यान, मत्सय व्यवसाय संस्था व भोई समाज या दोघातील हे भांडन असून याला राजकीय रंग देऊ नये, असे आवाहन मुबीन पठाण यांनी केले आहे. या हल्ल्याचा त्यांनी तीव्र निषेध केला़माजलगाव धरणावर १४४ कलम लागुभोई समाज व टेंडरधारक यांच्यातील वादाला हिंसक वळण लागले आहे. त्यामुळे उप-विभागीय अधिकारी महेंद्र कांबळे यांनी ३ ते १० आॅगस्ट या कालावधीत माजलगाव धरणावर १४४ कलम लागु केला आहे. २०० मीटरपर्यंत धरण परिसरात पाच किंवा त्या पेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश करण्यास मनाई आहे. उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा आहे़ (वार्ताहर)सहा आरोपींना कोठडीभोई समाजाच्या महिला व पुरुषांना मारहाण केल्या प्रकरणातील सहा आरोपींना माजलगाव पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. शेख जमील शेख अन्सार, शेख बशीर शेख बुबन, शेख अजीम शेख दिलावर, शेख अखील शेख अन्सार, शेख जावेद शेख मोहोम्मद, शेख दिलावर शेख मेहमुद या आरोपींना रविवारी माजलगाव न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर.के. गुजर यांनी ५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.