शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

तलवारीच्या म्यानमध्ये लपवून आणले एमडी ड्रग्ज; ४०० रुपये रोजाने मुलांना केले सप्लायर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 20:01 IST

अटकेतील आरोपीकडून तलवारीसह आणखी ड्रग्ज जप्त, शहरात ४०० रुपये रोजाने मुलांना केले सप्लायर

छत्रपती संभाजीनगर : चार दिवसांपूर्वी अटक केलेला कुख्यात गुन्हेगार, शहरातील अमली पदार्थांचा मुख्य तस्कर शेख अशपाक शेख पटेल (रा. चंपाचौक) याचा जिवलग मित्र शेख कलीम शेख सरदार (३५, रा. रवींद्रनगर) याने घराच्या पत्र्यावर तलवारीच्या म्यानमध्ये ड्रग्ज लपवून ठेवले होते. गुन्हे शाखेने शनिवारी तलवारीसह म्यानमधील ३३ ड्रग्जच्या पुड्या जप्त केल्या. त्यात २०.६९ ग्रॅम एमडी ड्रग्ज होते, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी सांगितले.

२४ जानेवारीपासून गुन्हे शाखेची चारपेक्षा अधिक पथके सातत्याने अशपाकचे सर्व रॅकेट मुळासकट संपवण्यासाठी कारवाई करीत होती. यात आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली असून अशपाकसाठी काम करणाऱ्या कलिमच्या घरातून २९ जानेवारी रोजी ५३.३२ ग्रॅम एमडी पावडरसह बेहिशेबी ३.२६ लाखांची रोख व २४ कॅरेटचे ८ तोळ्यांचे सोन्याचे दागिने जप्त केले. न्यायालयाने त्याला १ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणारा कलिम पोलिस कोठडीत चौकशीत पोपटासारखा बोलायला लागला. जप्त केलेल्या ५३.३२ ग्रॅम एमडी ड्रग्ज व्यतिरिक्त त्याने २०.६९ एमडी पत्र्यावर तलवारीच्या म्यानमध्ये ३३ पुड्या करून लपवले होते. सदर तलवारदेखील त्याने विक्री करण्यास नकार देणाऱ्यांना, पैसे बुडवणाऱ्यांना धमकावण्यासाठी घेतली होती. पोलिसांनी तलवार व ड्रग्ज शनिवारी जप्त केले.

अशपाकचे इंदूर कनेक्शनशहरात यापूर्वी नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या पातळ औषध, गोळ्यांचा पुरवठा इंदूरहून होत असल्याचे समोर आले होते. यावेळी अशपाक पटेलचेदेखील इंदूर कनेक्शनचे सबळ पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहे. विशेष म्हणजे एमडी सारखे ड्रग्जदेखील अशपाक इंदूरच्या तस्करांकडून मिळवतो. कलिमच्या चौकशीत ही बाब उघड झाली.

४०० रुपये रोजाने मुले, न ऐकल्यास मारहाणअशपाकने परिसरातील अनेक मुलांना ४०० रुपये रोजाने ऑर्डर पुरवण्यासाठी नेमले होते. अशपाकवर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल असून २०१७ मध्ये छावणीच्या हत्येत तो अनेक वर्षे कारागृहात होता. त्याचीच भीती दाखवून तो धाकदपटशाही करून स्थानिकांकडून हे काम करवून घेत होता. काम करण्यास नकार देणाऱ्यांना तो धमकावून मारहाणदेखील करायचा, असेही अटकेतील आरोपींनी पोलिसांना सांगितले.

अशपाकच्या घराचे डिव्हिआर जप्तचंपाचौकासह अशपाकचे अन्यत्र दोन ते तीन घरे आहेत. ही घरे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीत असून त्याचे संपूर्ण फुटेज अशपाक मोबाइलवर लाइव्ह पाहत होता. पोलिसांनी या सर्व कॅमेऱ्यांचे डिव्हिआर जप्त केले आहे. यात कैद झालेल्या प्रत्येक संशयिताचा आता कसून शोध सुरू आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : MD Drugs hidden in sword sheath; Children used as suppliers.

Web Summary : Sheikh Kaleem hid MD drugs in a sword sheath. Ashpak used children, paying ₹400 daily, to supply drugs, threatening them if they refused. Police seized drugs, cash, and gold; Ashpak's Indore connection revealed.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर