शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलच्या प्रकाशात प्रसुती

By admin | Updated: July 23, 2014 00:33 IST

तामलवाडी : बंद वीजपुरवठ्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करीत मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात महिलेचे बाळंतपण केले.

तामलवाडी : बंद वीजपुरवठ्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करीत मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात महिलेचे बाळंतपण केले. सदर महिलेने मंगळवारी पहाटे कन्यारत्नाला जन्म दिला. डॉक्टरांच्या तत्परतेमुळेच सुरक्षितरित्या प्रसुती होवू शकली, अशी प्रतिक्रीया वृंदावनी यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली.सोमवारी रात्री वादळी वाऱ्यामुळे अचानक विजेच्या तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. अशात सावरगाव येथील वृंदावनी अविनाश पवार (२०) या महिलेस मध्यरात्री प्रसूतीसाठी आरोग्य केंद्रात आणण्यात आले. येथील कर्मचाऱ्यांनी डॉ. एस. जी. मोरे यांना दूरध्वनीवरून कल्पना दिली. डॉक्टरही दवाखान्यामध्ये हजर झाले. अख्ख्या दवाखान्यात अंधार होता. काय करावे, हे कुणालाच कळत नव्हते. शेवटी कर्मचाऱ्यांनी जुनाट इमारतीतील सामान हटवून प्रसूतीसाठी जागा उपलब्ध केली. कर्मचाऱ्यांनी तयार केलेल्या तात्पुरत्या स्वरुपाच्या प्रसूतीगृहात डॉ. मोरे यांच्यासह आरोग्य सेविका एस. जे. उकिरडे, जे. बी. काळे या कर्मचाऱ्यांनी मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात पहाटेच्या सुमारास वृंदावनीची तपासणी केली. यावेळी सदरील महिलेचा रक्तदाब वाढल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यानंतर डॉक्टरांनी तात्काळ उपचार सुरू केले. पहाटेच्या सुमारास वृंदावनीने कन्येला जन्म दिला. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या धाडसामुळे बाळ व बाळंत सुखरुप असल्याची भावना नातेवाईकांनी व्यक्त केली. (वार्ताहर)