शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

मुलीला घाटीत टाकून माता पसार

By admin | Updated: July 22, 2014 00:48 IST

औरंगाबाद : घाटी रुग्णालयाच्या आवारात स्त्री जातीची दोन अर्भके कॅरिबॅगमध्ये फेकून मातेने पलायन केल्याचा प्रकार ताजा असतानाच सोमवारी पुन्हा मुलगी नको, या मानसिकतेचा अनुभव घाटीत आला.

औरंगाबाद : घाटी रुग्णालयाच्या आवारात स्त्री जातीची दोन अर्भके कॅरिबॅगमध्ये फेकून मातेने पलायन केल्याचा प्रकार ताजा असतानाच सोमवारी पुन्हा मुलगी नको, या मानसिकतेचा अनुभव घाटीत आला. आपल्या अवघ्या दोन महिन्याच्या मुलीला घाटी रुग्णालयात बेवारस सोडून मातेने पलायन केल्याची घटना समोर आली आहे. घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, सोमवारी दुपारी घाटी रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक २८ समोर एक बाळ रडत असल्याचे तेथील कर्मचाऱ्यांच्या नजरेस पडले. कर्मचाऱ्यांनी या बाळाला उचलले. ती मुलगी असल्याचे समोर आले. या मुलीला सध्या घाटीत ठेवण्यात आले आहे.मुलगी नको, या मानसिकतेतून निर्दयी मातेने या बाळाला घाटीत बेवारस सोडून पळ काढला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. या घटनेची बेगमपुरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ‘त्या’ अर्भकांचा तपास थंडावलाघाटी रुग्णालयाच्या आवारात पाच दिवसांपूर्वी कॅरिबॅगमध्ये मृतावस्थेतील दोन स्त्री जातीची अर्भके फेकूनदिलेली आढळून आली होती. हा अवैध लिंगभेद चाचणी आणि गर्भपाताचा प्रकार असल्याचा दाट संशय आहे. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात अज्ञात मातेविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मात्र, अद्याप बेगमपुरा पोलिसांना या प्रकरणाचे काहीही धागेदोरे सापडलेले नाहीत. बेगमपुरा पोलिसांनी हा तपासच थंड्या बस्त्यात टाकलेला दिसून येत आहे.