छत्रपती संभाजीनगरात गोदामाला भीषण आग
By संतोष हिरेमठ | Updated: December 20, 2024 04:56 IST2024-12-20T04:55:12+5:302024-12-20T04:56:10+5:30
शहरातील नारेगाव येथील एका गोदामाला आग लागण्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली.

छत्रपती संभाजीनगरात गोदामाला भीषण आग
संतोष हिरेमठ, छत्रपती संभाजीनगर : शहरातील नारेगाव येथील एका गोदामाला आग लागण्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन विभागाचे ४ बंब आणि टँकर घटनास्थळी दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
नारेगाव येथील गोदामाला आग लागल्याचा फोन मध्यरात्री १२:१० वाजेच्या सुमारास अग्निशमन विभागाला आला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. आगीचे रौद्ररूप पाहता चिकलठाणा, सिडको, एन-९ आणि पदमपुरा येथील एकूण ४ अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. उपअग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर, ड्यूटी इन्चार्ज सोमीनाथ भोसले, फायरमन शुभम शिरखे, साळुंके, आराख, विनोद तुपे आदी आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत होते. लाकडे, पुठ्ठे, बाटल्या आदींचे हे गोदाम असून, या घटनेत कोणीही भाजले गेले नाही, अशी माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.