शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गावर ट्रकला धडकल्यानंतर ट्रॅव्हल्सला भीषण आग; एका प्रवाशाचा अंत, ३१ थोडक्यात बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 10:35 IST

​समृद्धी महामार्गावर पहाटेच्या सुमारास ट्रॅव्हल्सची ट्रकला धडक; बुलढाण्याच्या प्रवाशाचा मृत्यू.

छत्रपती संभाजीनगर:समृद्धी महामार्गावरअपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. आज (२ जानेवारी) पहाटे तीन वाजेच्या सुमारास माळीवाडा टोलनाक्याजवळ एका खासगी ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या धडकेनंतर मिनी बसला भीषण आग लागली. या दुर्दैवी घटनेत एका प्रवाशाचा होरपळून मृत्यू झाला असून अन्य प्रवासी थोडक्यात बचावले आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, 'साईराम ट्रॅव्हल्स'ची भारत बेंझ बस (क्रमांक MH19 CX 3015) मुंबईच्या दिशेने जात होती. पहाटे ३:०१ वाजेच्या सुमारास माळीवाडा टोलनाक्यापासून १५ ते १६ किमी अंतरावर (महामार्ग क्र. ४६३) या बसने समोरील ट्रकला (क्रमांक CG04 M 8711) जोरात धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बसने तात्काळ पेट घेतला.

अग्निशमन दलाची धाव आणि बचावकार्य

​घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पदमपुरा आणि कांचनवाडी अग्निशमन केंद्राची पथके तात्काळ घटनास्थळी रवाना झाली. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून बसला लागलेली आग आटोक्यात आणली. बसमध्ये एकूण २९ प्रवासी, २ ड्रायव्हर आणि १ कंडक्टर असे एकूण ३२ जण होते. यातील ३१ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले, मात्र एका प्रवाशाचा मृत्यू झाला. ​सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

मयत प्रवाशाची ओळख: या अपघातात अमोल सुरेश शेलकर (वय ३८, रा. खामगाव, जि. बुलढाणा) यांचा मृत्यू झाला आहे.

समृद्धी महामार्ग आणि अपघातांचे सत्र

​समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून यावर अपघातांचे प्रमाण चिंतेचा विषय ठरले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, महामार्ग सुरू झाल्याच्या पहिल्या वर्षातच शेकडो लहान-मोठे अपघात झाले आहेत.

  • प्रमुख कारणे: हायवे हिप्नोसिस (चालकाला डुलकी लागणे), अतिवेग, टायर फुटणे आणि रात्रीच्या वेळी वन्य प्राण्यांचे आडवे येणे.
  • मागील गंभीर घटना: यापूर्वी सिंदखेडराजा जवळ झालेल्या बस अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. अशा घटनांमुळे समृद्धी महामार्गाच्या सुरक्षिततेवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
English
हिंदी सारांश
Web Title : Samruddhi Mahamarg Accident: Bus Fire Kills One, 31 Passengers Escape

Web Summary : A truck collision on the Samruddhi Mahamarg sparked a deadly bus fire near Maliwada. One passenger died, while 31 others narrowly escaped. The accident disrupted traffic, raising safety concerns about the expressway.
टॅग्स :Accidentअपघातchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग