मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांच्या प्रयत्नांमुळे

By | Updated: December 4, 2020 04:09 IST2020-12-04T04:09:13+5:302020-12-04T04:09:13+5:30

येमेनच्या कैदेतून २० जहाज कर्मचाऱ्यांची सुटका मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांच्या प्रयत्नांमुळे येमेनच्या कैदेतून २० जहाज कर्मचाऱ्यांची सुटका .......... ...

Masalaking Dr. Thanks to the efforts of Dhananjay Datar | मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांच्या प्रयत्नांमुळे

मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांच्या प्रयत्नांमुळे

येमेनच्या कैदेतून २० जहाज कर्मचाऱ्यांची सुटका

मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांच्या प्रयत्नांमुळे

येमेनच्या कैदेतून २० जहाज कर्मचाऱ्यांची सुटका

..........

मुक्त झालेल्यांत १४ भारतीय - प्रत्येकी २० हजार रुपयांची तातडीची मदत

मुंबई : गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून येमेनमध्ये कैदेत अडकलेल्या २० जहाज कर्मचाऱ्यांची अखेर सुखरूप सुटका झाली आहे. यामध्ये १४ भारतीय, ५ बांगलादेशी व एका इजिप्शियन नागरिकाचा समावेश आहे. या सर्वांच्या सुटकेसाठी दुबईतील अल अदिल ट्रेडिंग समूहाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. डॉ. दातार यांनी स्वतःतर्फे मदत म्हणून या भारतीय कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी २० हजार रुपये मदत हस्तांतरित केली आहे. चालू आठवड्याच्या अखेरीस हे १४ भारतीय एडनहून मुंबईला परतण्याची अपेक्षा आहे. येमेनमध्ये सध्या भारताचा दूतावास नसल्याने शेजारच्या जिबोती देशातील भारतीय दूतावास या कर्मचाऱ्यांना तात्पुरते पासपोर्ट, तसेच येमेनी प्रशासनातर्फे व्हिसा मंजुरी मिळवून देण्याबाबत प्रयत्नशील आहे.

ओमानस्थित एका परदेशी जहाज वाहतूक कंपनीत काम करण्यासाठी हे २० जण गेल्या जानेवारीत मस्कतला गेले होते. कंपनीला सौदी अरेबिया देशाचे वाहतुकीचे कंत्राट मिळाल्याने ते दोन जहाजांतून ३ फेब्रुवारीला ओमानहून सौदी याम्बो बंदरापर्यंत प्रवासासाठी रवाना झाले. १२ फेब्रुवारीला जहाजाला खराब हवामानामुळे एका जागी थांबावे लागले. दुर्दैवाने ती जागा येमेनच्या युद्धप्रवण क्षेत्रात होती. येमेनी तटरक्षकांनी सर्व कर्मचाऱ्यांना अटक करून येमेनच्या साना शहरातील एका हॉटेलात स्थानबद्ध केले.

अलीकडेच काही दिवसांपूर्वी त्यांना संपर्काची परवानगी देण्यात आली. या कर्मचाऱ्यांनी डॉ. दातारांशी संपर्क साधला. डॉ. दातार यांनी त्वरित सक्रिय होऊन जिबोतीमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधून अथक पाठपुरावा केला. जहाज कर्मचाऱ्यांतील भारतीयांमध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूरचे संदीप बाळू लोहार (खडकेवाडा, ता. कागल), नीलेश धनाजी लोहार (कौलव, ता. राधानगरी), फिरोज नसरुद्दीन झारी (रत्नागिरी), अहमद अब्दुल गफूर वाकणकर (दापोली), तन्मय राजेंद्र माने (मांडवा, अलिबाग), दाऊद महमूद जोवरक (दापोली, मंडणगड), गोव्यातील चेतन हरिश्चंद्र गवस यांचा समावेश आहे. डॉ. दातार यांच्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना नीलेश लोहार म्हणाले, डॉ. दातार यांनी आम्हाला परतीच्या प्रवासासाठी आर्थिक आधार पुरवला आहे. त्यांचे हे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही.

...........

आतापर्यंत ५ हजार भारतीयांची केली सुटका

डॉ. धनंजय दातार यांनीही या कर्मचाऱ्यांच्या सुटकेबद्दल आनंद प्रकट केला आहे. ते म्हणाले, ‘आतापर्यंत कोरोनाच्या साथीमुळे आखाती देशांत अडकलेल्या ५,००० हून अधिक भारतीयांना आमच्या अल अदिल कंपनीने सर्व खर्च उचलून सुखरूप घरी पोहोचवले आहे. सौदी अरेबियातही तुरुंगवासात अडकलेल्या ७०० भारतीय कामगारांची सुटका करण्यासाठी आम्ही पाठपुरावा केला आहे. जिबोतीमधील भारतीय राजदूत अशोक कुमार आणि निवृत्त भारतीय राजदूत ज्ञानेश्वर मुळे यांनी केलेल्या मदतीबद्दल मी त्यांचा विशेष आभारी आहे. या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीने पगाराची काहीही रक्कमही दिलेली नाही. त्यांचा न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठीही मी प्रयत्न करणार आहे.

............

Web Title: Masalaking Dr. Thanks to the efforts of Dhananjay Datar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.