शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

व्यवसायाच्या आमिषातून लाखोंची फसवणुक, तणावातून विवाहितेने संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 15:31 IST

गुन्हा दाखल होताच बेगमपुरा पोलिसांकडून २ भावांना अटक, अनेकांना फसवल्याचा पोलिसांना संशय

छत्रपती संभाजीनगर : व्यवसायात दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवत पैशांसह सोने उकळून २ भावांनी फसवणुक केल्याने तणावाखाली गेलेल्या मनिषा संजय पांडे (३२, रा. पोलिस कॉलनी, हर्सुल) यांनी विष प्राषण केल होते. दि. ७ रोजी मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्यांना फसवणाऱ्या रविंद्र प्रेमनाथ बोर्डे (३६) व अनुपम प्रेमनाथ बोर्डे (४०, दोघे रा. सिलेगाव, गंगापुर) यांना बेगमपुरा पोलिसांनी अटक केली. तर रवींद्रची पत्नी ज्योती पसार झाली.

२०१७ मध्ये आरोपी अनुपम मनिषा यांच्या घरात भाडेतत्वावर राहण्यास गेला होता. जवळपास ६ वर्षे अनुपम, भाऊ रविंद्रसोबत त्यांच्या घरात राहिले. त्या दरम्यान रविंद्र हा कामगार कल्याण आयुक्तालयात एजंट होता. या विभागातर्फे मुलांना शालेय साहित्याचे वाटप होत होते. त्यासाठी रविंद्रने मनिषा यांचा मुलगा आकाशला संस्था स्थापन करुन अशी शासकीय कामे करुन नफा मिळण्याचे आश्वासन दिले. त्याच्यावर विश्वास ठेवत मनिषा यांनी आकाशसाठी त्याला १ लाख ४४ हजार दिले. रविंद्रने एप्रिल २०२३ मध्ये प्रारंभी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था स्थापन केली. त्याच्या अध्यक्षपदी रविंद्रने अनुमपला तर सचिवपदी स्वत:ची नियुक्ती केली. स्थापनेनंतर मात्र त्याने एकदाही आकाश, मनिषा यांना नफा दिला नाही. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी रविंद्रने लग्नाचे कारण करुन पुन्हा त्यांच्या नावे २ लाख रुपये कर्ज काढले. त्याचीही परतफेड केली नाही. पुन्हा त्यांचा विश्वास जिंकत नव्या व्यवसायासाठी त्यांच्याकडून ३.५ तोळ्याचे दागिने घेत ८ दिवसांत परत करण्याचे आश्वासन दिले. मात्र, ते देखील परत केले नाही.

धमक्या आणि मारहाणमनिषा व आकाशने सातत्याने रविंद्र व अनुपमकडे पैसे, दागिने परत करण्यासाठी तगादा लावला. मात्र, दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. काही दिवसांपुर्वी तीघांनी मनिषा यांना धमकावत मारहाण केली. या तणावातून मनिषा यांनी १९ सप्टेंबर रोजी विषारी औषधाचे सेवन केले.

१० ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी७ ऑक्टोबर रोजी मनिषा यांचा मध्यरात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाला. विषारी औषध सेवन करण्यापुर्वी त्यांनी लिहिलेली चिठ्ठी कुटुंबाला मिळाली. त्यात त्यांनी स्पष्टपणे रविंद्र, अनुपम व रविंद्रच्या पत्नीच्या छळामुळे आत्महत्या करत असल्याचे नमुद केले होते. त्या आधारे बेगमपुऱ्याचे उपनिरीक्षक मारोती मदेवाड यांनी गुन्हा दाखल करत बहिणीकडे लपून बसलेल्या रविंद्र व अनुपमला अटक केली. न्यायालयाने दोघांना १० ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

English
हिंदी सारांश
Web Title : Fraud in Business Leads to Suicide of Married Woman

Web Summary : A married woman in Chhatrapati Sambhajinagar died by suicide after being defrauded of lakhs under the guise of a lucrative business deal. Two brothers have been arrested, while one accomplice is absconding. The victim consumed poison due to harassment.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी