दुसरे लग्न करण्यासाठी विवाहितेचा विष पाजून खून
By Admin | Updated: August 24, 2014 00:16 IST2014-08-23T23:43:51+5:302014-08-24T00:16:50+5:30
बदनापूर : तालुक्यातील ढोकसाळ येथे दुसरे लग्न करण्यासाठी आजमाबी सय्यद सिंकदर (१९) या तरूण विवाहितेचा सासरच्या मंडळीने बेदम मारहाण करून विषारी द्रव्य

दुसरे लग्न करण्यासाठी विवाहितेचा विष पाजून खून
बदनापूर : तालुक्यातील ढोकसाळ येथे दुसरे लग्न करण्यासाठी आजमाबी सय्यद सिंकदर (१९) या तरूण विवाहितेचा सासरच्या मंडळीने बेदम मारहाण करून विषारी द्रव्य पाजून निर्घृण खून केला. बदनापूर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला.
याच गावातील हबीबखाँ हुसेनखाँ पठाण यांच्या मुलगी आजमाबी हिचा विवाह काही दिवसांपूर्वीच सिकंदर सय्यद महेमुद याच्यासोबत झाले होते. लग्नानंतर काही दिवसांनी तिला सासरच्या मंडळीने त्रास देण्यास सुरूवात केली. तुझ्या वडिलांनी लग्नात काहीच दिले नाही, असे सांगून त्रास दिला. सिकंदरने मला दुसरे लग्न करावयाचे आहे, असे सांगत मारहाण करण्यास सुरूवात केली. २२ आॅगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता बेदम मारहाण करून जायबंदी केले. तिला विषारी द्रव्य पाजून जिवे मारले.
याप्रकरणी हबीबखाँ पठाण यांच्या फिर्यादीवरून बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना अटक झाली नाही.
जालना शहरातील मंगळबाजार भागात मुलींची छेड काढून त्यांना त्रास देणाऱ्या तिघा युवकांवर पोलिस अधीक्षकांच्या दामिनी पथकाने शुक्रवारी कारवाई केली. या तिघांवर सदर बाजार पोलिस ठाण्यात प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.
४मंगळबाजार भागात काही टारगट तरूण मुलींची छेड काढत असल्याची तक्रार पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांच्याकडे करण्यात आली होती. दामिनी पथकाच्या प्रमुख कलम गिरी यांच्यासह वंदना म्हस्के, माधुरी फुके, रूपाली फुके, रिना मेहेर, मेघना नागलोत यांनी पाळत ठेवून तिघाही सडक सख्याहरींना घेरले. त्यांना भररस्त्यावर पोलिसी हिसका दाखवताच भंबेरी उडाली.