तीन चिमुकल्यांसह विवाहितेची आत्महत्या
By Admin | Updated: May 24, 2016 01:03 IST2016-05-24T01:02:52+5:302016-05-24T01:03:34+5:30
लोहा : लोहा तालुक्यातील कपिलेश्वर सांगवी येथील एका विवाहितेने घरगूती कारणावरून ३ चिमुकल्यांसह विहीरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना २३ मे रोजी सायंकाळी घडली.

तीन चिमुकल्यांसह विवाहितेची आत्महत्या
लोहा : लोहा तालुक्यातील कपिलेश्वर सांगवी येथील एका विवाहितेने घरगूती कारणावरून ३ चिमुकल्यांसह विहीरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना २३ मे रोजी सायंकाळी घडली. दरम्यान, या घटनेची माहिती रात्री उशिरा पालिसांना मिळाली. रात्री १२ वाजेपर्यंत याप्रकरणी सोनखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
या संदर्भात सोनखेड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सांगितलेले घरातील काम पती ऐकत नाहीत, शाब्दीक चकमकीच्या कारणावरुन विवाहिता प्रियंका माधव वानखेडे (वय २८, रा. कपिलेश्वर सांगवी, ता. लोहा, जि. नांदेड) हिने साक्षी माधव वानखेडे (वय ६), कपिल माधव वानखेडे (वय ५), प्रतिक माधव वानखेडे (वय ३) यांच्यासह गावाशेजारील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली.
पती माधव वानखेडे हे सतत कुटुंबाकडे दुर्लक्ष करतात. सोमवारी सायंकाळी पत्नी प्रियंकाने मुलगी साक्षी हीस वडिलांस घरी बोलावून आणण्यास सांगितले असता, मित्रासमवेत गप्पा मारत असल्याने घराकडे पती आले नसल्याचा क्षुल्लक राग मनात ठेवून तिन्ही मुलांसमवेत गावाशेजारील भानुदास रामजी वानखेडे यांच्या विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. रागाच्या भरात तीन मुलांसह विवाहितेने आत्महत्या केल्याच्या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. (वार्ताहर)
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मध्यरात्री १२ वाजता चारही मृतदेह आणण्यात आले. मंगळवारी सकाळी शवविच्छेदन होईल. नातेवाईकांचा जबाब नोंदवणे व पंचनामाही सुरू आहे, अशी माहिती सोनखेड ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल वेदपाठक, डोईबळे, तांबोळी, कारामुंगे,हंबर्डे यांनी रात्री उशिरा दिली.