नपुंसकत्व लपवून केले लग्न; तरुणासह सासरच्यांवर पत्नीने नोंदविला गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 14:25 IST2021-06-22T13:06:54+5:302021-06-22T14:25:43+5:30
Crime against a man who done marriage by concealing impotence नाशिक येथील आरोपी सुरेश (नाव बदलले आहे) याचे गतवर्षी डिसेंबर महिन्यात औरंगाबादेतील तरूणीसोबत लग्न झाले.

नपुंसकत्व लपवून केले लग्न; तरुणासह सासरच्यांवर पत्नीने नोंदविला गुन्हा
औरंगाबाद : नपुसंक असल्याचे लपवून तरुणीसोबत थाटात विवाह करणाऱ्या तरुणासह त्याच्या नातेवाईकांविरुद्ध विवाहितेने पोलिसांत गुन्हा नोंदविला. आराेपी पतीसह सासरच्या मंडळीने तिचे दागिने स्वत:कडे घेतले आणि घर घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी छळ केल्याचा आरोप तिने तक्रारीत केला.
नाशिक येथील आरोपी सुरेश (नाव बदलले आहे) याचे गतवर्षी डिसेंबर महिन्यात औरंगाबादेतील तरूणीसोबत लग्न झाले. तो नाशिक येथे औषध निर्माता आहे. त्याचा स्वत:चा व्यवसाय आहे. लग्न झाल्यापासून तो सतत तिच्यापासून दूर राहतो. तो दारू पिऊन घरी येतो आणि सतत मुलांसोबत राहतो. यामुळे तरुणीने त्याच्या या वागण्याविषयी त्याच्या नातेवाईकांकडे तक्रार केली. मात्र, त्यांनी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले.
आरोपी सुरेश हा नपुंसक आहे आणि तो त्याच्या आजारांवर उपचार घेत असल्याचे तरुणीला समजले. ही बाब सुरेश आणि त्याची आई, बहीण आणि भाऊजी यांना माहिती होती. असे असताना आरोपींनी ही बाब लपवून आपली आणि आपल्या कुटुंबाची फसवणूक केल्याचे तरुणीच्या लक्षात आले. तिच्या अंगावरील सोन्याचांदीचे दागिने त्याने फिरायला जायचे सांगून काढून घेतले. नंतर हे दागिने परत केले नाही. एवढेच नव्हे तर त्यांनी घर बांधण्यासाठी माहेरून पैसे आणावे, याकरिता तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे तक्रारीत नमूद केले.
......