शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
4
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
5
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
6
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
7
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
8
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
9
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
10
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
11
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
12
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
13
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
14
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
15
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
16
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
17
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
18
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
19
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
20
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याचा युवा वक्ता स्पर्धा ५ जानेवारीला

By admin | Updated: December 28, 2014 01:26 IST

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आ. सतीश चव्हाण यांच्या वतीने ‘मराठवाड्याचा युवा वक्ता’ ही आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा ५ जानेवारीपासून सुरू होत आहे.

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आ. सतीश चव्हाण यांच्या वतीने ‘मराठवाड्याचा युवा वक्ता’ ही आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा ५ जानेवारीपासून सुरू होत आहे. स्पर्धेचे यंदा ५ वे वर्ष असून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत या स्पर्धेच्या फेऱ्या आयोजित करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात आ. सतीश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, जिल्हानिहाय आयोजित केलेल्या या स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त स्पर्धकांची महाअंतिम फेरी १३ जानेवारी रोजी औरंगाबादेतील देवगिरी महाविद्यालयात होईल.यंदा जिल्हानिहाय फेरीसाठी ‘भय इथले संपत नाही’, ‘नाही निर्मळ मन, काय करील स्वच्छता मिशन’, ‘सोशल मीडियाची ऐशी की तैशी’, ‘स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला...’ हे चार विषय ठेवण्यात आले आहेत. या स्पर्धेतील प्रत्येकी तीन याप्रमाणे एकूण २४ विजेत्या स्पर्धकांची महाअंतिम फेरी होईल. यासाठी ‘शरद पवार : काटेवाडी ते दिल्ली व्हाया मुंबई’, ‘अच्छे दिन : सत्य की आभास’, ‘मराठवाड्याची माती दुष्काळाने करपली’, ‘अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ हे चार विषय ठेवण्यात आले आहेत. महाअंतिम फेरीतील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे १५, १० व ५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. विनाशुल्क असलेल्या या स्पर्धेसाठी पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या दिवशी एक तास अगोदर नोंदणी करता येईल.