वाळूजमध्ये मराठवाडा पाणी परिषदची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 20:48 IST2018-11-24T20:48:10+5:302018-11-24T20:48:35+5:30
वाळूज महानगर : वाळूजसह परिसरातील संभाव्य पाणीटंचाई, चारा छावण्या सुरु करणे, रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामांचे नियोजन करुन कृती आराखडा तयार करणे आदी विषयांवर शनिवारी मराठवाडा पाणी परिषदतर्फे आयोजित बैठकीत चर्चा करण्यात आली.

वाळूजमध्ये मराठवाडा पाणी परिषदची बैठक
वाळूज महानगर : वाळूजसह परिसरातील संभाव्य पाणीटंचाई, चारा छावण्या सुरु करणे, रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामांचे नियोजन करुन कृती आराखडा तयार करणे आदी विषयांवर शनिवारी मराठवाडा पाणी परिषदतर्फे आयोजित बैठकीत चर्चा करण्यात आली.
गंगापूर तालुक्यातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासह विविध उपाययोजना करण्यासंदर्भात ग्रामपंचायत कार्यालयात गंगापूर पंचायत समितीच्या सभापती ज्योती गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी सरपंच पपीन माने, मराठवाडा पाणी परिषदचे ज्ञानेश्वर निकम, ज्ञानेश्वर हनवते, अविनाश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीत गंगापूर तालुक्यातील दुष्काळी स्थितीचा सर्कलनिहाय आढावा घेण्यात आला. अत्यल्प पावसामुळे खरीप व रब्बी हंगामातील पिके हातची गेली असून, शेतकऱ्यांना अर्थिक नुकसानीची झळ सोसावी लागत आहे. आतापासून अनेक गावात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. पावसामुळे पिके हातची गेल्यामुळे हंगामी रोजगारही बुडाला असून, अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्नही बिकट बनला आहे. पशुधन कसे वाचवावे असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. यावेळी बैठकीत अनेकांनी दुष्काळी स्थितीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजना आखण्याची मागणी केली. सूत्रसंचालन मंगल काळे तर आभार अविनाश गायकवाड यांनी मानले. या बैठकीला विद्या भांबरे, अनिल नेमाणे, पांडुरंग गायकवाड,संदीप जगताप, द्रोपदा मोरे,सिंधु ठापसे, सुवर्णा मंडलिक, फरजाना सय्यद, निरंजन खैरनार, दीपक पाटणी, आदर्श पाटील आदीसह ४२ स्वयंसेवी संस्थेच्या पदाधिकाºयांची उपस्थिती होती.
दुष्काळी स्थितीचा सामना करण्यासाठी उपाययोजना
शासनाच्यावतीने तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, शेतकरी व नागरिकांना विविध स्वरुपाची मदत केली जाणार असल्याचे सभापती ज्योती गायकवाड यांनी सांगितले. दुष्काळीस्थितीचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या असून, संबंधित अधिकाºयांना या संदर्भात सूचना देण्यात येणार आहे. गावातील प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी वाळूजला १ डिसेंबरला जनता दरबार भरविण्यात येणार असल्याची माहिती सभापती गायकवाड यांनी दिली.