शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

पहिल्या फेरीत राष्ट्रवादीचे विक्रम काळे आघाडीवर तर शिक्षक संघाचे विश्वासराव दुसऱ्या स्थानी

By विकास राऊत | Updated: February 2, 2023 13:51 IST

यावेळी १४ तर २०१७ साली २० उमेदवार निवडणूक मैदानात होते. प्रमुख लढत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप, शिक्षक संघाच्या उमेदवारांत झाली आहे.

औरंगाबाद:शिक्षक मतदारसंघात १४ उमेदवारांमुळे बहुरंगी लढत झाली. आज मतमोजणीच्या दिवशी राष्ट्रवादी, मराठवाडाशिक्षक संघ आणि भाजपयांच्यात तगडी फाईट होईल असे चित्र दिसत आहे. यावेळी १४ तर २०१७ साली २० उमेदवार निवडणूक मैदानात होते. प्रमुख लढत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप, शिक्षक संघाच्या उमेदवारांत झाली आहे.

पहिल्या फेरीत राष्ट्रवादीचे विक्रम काळे १८ हजार मते घेऊन आघाडीवर आहेत. मराठवाडा शिक्षक संघाचे सूर्यकांत विश्वासराव-१३२६८ हे दुसऱ्या तर भाजपचे किरण पाटील - १३२४७ मते घेऊन तिसऱ्या स्थानी आहेत. दरम्यान २ हजार मते अवैध झाली.

अशी सुरु आहे मतमोजणी.....५६ टेबलवर मतमोजणी सुरु आहे. यासाठी ७०० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सुरुवातीला सर्व मतपेटीतील मते एका हौदात टाकण्यात येतील. त्यानंतर, सर्व मतपत्रिकांची सरमिसळ करण्यात येईल. यातून २५ मतपत्रिकांचा एक गठ्ठा, याप्रमाणे ४० गठ्ठे अशी एक हजार मते प्रत्येक टेबलवर देण्यात येतील. या टेबलवर प्रथम क्रमांकाच्या पसंतीनुसार मतपत्रिकांचे वर्गीकरण करण्यात येईल. एकूण वैध मतांप्रमाणे कोटा निश्चित करण्यात येईल. त्यानंतर मतांच्या फेऱ्या सुरू होतील. या सगळ्या प्रक्रियेला पूर्ण दिवस लागू शकतो, अशी शक्यता निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांनी वर्तविली.

उमेदवारांमध्ये धाकधूक.....भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीसह मराठवाडा शिक्षक संघ व अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मतमोजणीपूर्वी सर्वांची धाकधूक वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आ.विक्रम काळे, भाजपकडून प्रा.किरण पाटील, वं.ब.आघाडीकडून कालिदास माने, तर मराठवाडा शिक्षक संघाकडून सूर्यकांत विश्वासराव, अपक्ष प्रदीप सोळुंके, मनोज पाटील, संजय तायडे, कादरी शाहेद अब्दुल गफूर, अनिकेत वाघचवरे, नितीन कुलकर्णी, विशाल नांदरकर, प्रा.अश्विनकुमार क्षीरसागर, आशिष देशमुख, ज्ञानोबा डुकरे यांनी निवडणूक लढविली.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाTeacherशिक्षकAurangabadऔरंगाबाद