मराठवाड्यात दुपारी २ वाजेपर्यंत ३७ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 15:56 IST2020-12-01T15:56:08+5:302020-12-01T15:56:48+5:30
मराठवाड्यात ३ लाख ७४ हजार मतदार असून ८१३ मतदान केंद्र आहेत.

मराठवाड्यात दुपारी २ वाजेपर्यंत ३७ टक्के मतदान
औरंगाबादःमराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळी ८ वाजेपासून मतदानास सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या निवडणुकीत मतदान केंद्रांवर मतदारांची तुरळक गर्दी दिसून येत आहे. सकाळी ८ ते १० या दोन तासांत अवघे ७.६३ टक्के मतदान झाले होते. यानंतर दुपारी १२ पर्यंत मतदान टक्केवारी २०. ७३ टक्के पोहोचली आहे. तर दुपारी २ वाजेपर्यंत ३७.०८ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. यामुळे उरलेल्या तासात पदवीधर मतदारांकडून मतदान करवून घेण्याचे मोठे आव्हान उमेदवारांपुढे आहे.
मराठवाड्यात ३ लाख ७४ हजार मतदार असून ८१३ मतदान केंद्र आहेत. दुपारी २ वाजेपर्यंत विभागात ३७. ०८ टक्के मतदान झाले. परभणी जिल्ह्यात सर्वात जास्त ४१.०७ टक्के तर सर्वात कमी लातूर जिल्ह्यात ३२. ५३ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ३६.९२ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
( जिल्हा, मतदार, मतदान केंद्र, मतदान टक्केवारी )
औरंगाबाद : मतदार -1 लाख 06 हजार 379, मतदान केंद्र - 206 : टक्के : ३६.९२
जालना : मतदार - 29 हजार 765, मतदान केंद्र - 74, टक्के : ४०.११
परभणी : मतदार - 32 हजार 681, मतदान केंद्र - 78, टक्के : ४१. ०७
हिंगोली : मतदार - 16 हजार 764, मतदान केंद्र 39, टक्के : ३४. २६
नांदेड : मतदार - 49 हजार 285, मतदान केंद्र 123, टक्के : ३४. ८९
लातूर : मतदार - 41 हजार 190, मतदान केंद्र - 88, टक्के : ३२. ५३
उस्मानाबाद : मतदार - 33 हजार 632, मतदान केंद्र - 74, टक्के : ३८. २३
बीड : मतदार - 64 हजार 349, मतदान केंद्र- 131, टक्के : ३८. ६७