शहरं
Join us  
Trending Stories
1
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
2
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
3
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर
4
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
5
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
6
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
7
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
8
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
9
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
10
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
11
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
12
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
13
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
14
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
15
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
16
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
17
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
18
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
19
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
20
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?

Maratha Reservation: 24 तासांत मराठा आरक्षणासाठी कालबद्ध कार्यक्रम घोषित करा, मराठा क्रांती मोर्चाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 17:56 IST

राज्यभरात मराठा आंदोलन पेटलं आहे. परंतु ते हिंसक होऊ देऊ नका. तसेच आंदोलनासाठी कोणीही आत्महत्या करू नका, तुमचं भविष्य सुरक्षित होण्यासाठीच आरक्षणाची मागणी केली जातेय.

औरंगाबाद- राज्यभरात मराठा आंदोलन पेटलं आहे. परंतु ते हिंसक होऊ देऊ नका. तसेच आंदोलनासाठी कोणीही आत्महत्या करू नका, तुमचं भविष्य सुरक्षित होण्यासाठीच आरक्षणाची मागणी केली जातेय. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या करू नका, असं आवाहन मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी पत्रकार परिषद घेऊन केलं आहे. तसेच सरकारनं विशेष अधिवेशन कधी घेणार याची तारीख जाहीर करावी आणि मराठ्यांना आरक्षण कसं देणार, काय निकष लावणार यांचीही माहिती उघड करावी, असंही समन्वयकांनी सरकारला सांगितलं आहे. मराठा तरुणांना वाटते की, सरकार आपल्याला फसवत आहे. आंदोलनात आतापर्यंत चार बळी गेले आहेत. यामुळे अशा घटना पुढे घडू नये यासाठी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी २४ तासांत कालबद्ध कार्यक्रम घोषित करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाच्या औरंगाबाद येथील समन्वयकांची आज सायंकाळी पत्रकार परिषद झाली. यात समन्वयक विनोद पाटील यांनी ही माहिती दिली.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात आंदोलक आक्रमक झाले आहेत. आरक्षणासाठी तरुण आत्महत्या करत आहेत. आज औरंगाबाद येथे प्रमोद होरे पाटील या तरुणाने रेल्वे खली उडी घेऊन आत्महत्या केली. यानंतर आंदोलकांनी मुकुंदवाडी परिसर बंद केला. तसेच जालना रोडवर रस्तारोको केले. यासोबतच शहरात हर्सूल सावंगी आणि क्रांती चौक येथेही आंदोलने झाली. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चातर्फे आज सायंकाळी पत्रकार परिषद घेण्यात आली. यात मराठा क्रांती मोर्चाचे विनोद पाटील, रवी काळे, राजेंद्र जंजाळ, अभिजीत देशमुख, बाळासाहेब थोरात, आप्पासाहेब कुढेकर, सुरेश वाकडे, रमेश केरे, चंद्रकांत भराड, मनोज गायके यांची उपस्थिती होती. यावेळी समन्वयक विनोद पाटील यांनी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले, सद्य स्थितीत मराठा समाजाच्या तरुणांना असे वाटते की सरकार त्यांना फसवत आहे. आंदोलनात आतापर्यंत चार बळी गेले असून आणखी अशा घटना घडू नये यासाठी  सरकारने गांभीर्याने निर्णय घ्यावा. सरकारने चर्चा न करता आता कृती करावी. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी २४ तासात कालबद्ध कार्यक्रम घोषित करण्याची मागणीही यावेळी मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आली.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा