Maratha Kranti Morcha : 'मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची माफी मागावी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 18:05 IST2018-07-23T16:42:42+5:302018-07-23T18:05:10+5:30
Maratha Kranti Morcha : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीं मराठा समाजाचे बदनामी केल्याबद्दल मराठा समाजाची जाहीर माफी मागावी

Maratha Kranti Morcha : 'मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची माफी मागावी'
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीं मराठा समाजाचे बदनामी केल्याबद्दल मराठा समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक प्रवीण गायकवाड यांनी पुण्यात केली.
मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरला पूजेसाठी व दर्शनासाठी येण्याविषयी घातपात होण्याची शक्यता असल्याचे जाहीर केले.त्यांनी तो अहवाल जाहीर करावा अशी मागणीही त्यांनी केला. मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करणारी मुलेही वारकऱ्यांचीच मुले आहेत.त्यामुळे त्यांना घातपाती ठरविणे हा तमाम वारकऱ्यांना अपमान आहे अशी टीकाही त्यांनी केली.काल मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस होता. त्यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबई दौऱ्यावर होते, त्यामुळे त्यांनी पंढरपूरला येण्याचे रद्द केले.परंतु त्याचे खापर मात्र गोरगरीब जनतेवर फोडले आणि वारकऱ्यांसोबत महाराष्ट्रातील जनतेचीही दिशाभूल आणि फसवणूक केली असा दावाही त्यांनी केला.सरकार स्वतः कोर्टात लवकर अहवाल देत नसल्याने आरक्षण मिळण्यास उशिर होत आहे असेही ते म्हणाले.