छत्रपती संभाजीनगरचे नवे पोलिस आयुक्त मनोज लोहिया
By राम शिनगारे | Updated: April 24, 2023 18:34 IST2023-04-24T18:34:15+5:302023-04-24T18:34:29+5:30
पिंपरी चिंचवडचे पोलिस सहआयुक्त असलेले मनोज लोहिया हे शहराचे नवे पोलिस आयुक्त असणार आहेत.

छत्रपती संभाजीनगरचे नवे पोलिस आयुक्त मनोज लोहिया
छत्रपती संभाजीनगर : शहराचे नवे पोलिस आयुक्त म्हणून पिंपरी चिंचवडचे पोलिस सह आयुक्त मनोज लोहिया यांची नियुक्त राज्य शासनाने केली आहे. याविषयीचे आदेश २४ एप्रिल रोजी काढण्यात आले.
पिंपरी चिंचवडचे पोलिस सहआयुक्त असलेले मनोज लोहिया हे शहराचे नवे पोलिस आयुक्त असणार आहेत. विद्यमान पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या जागी ते पदभार स्विकारतील. त्याचवेळी छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक के.एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांची बदली, विशेष पोलिस महानिरीक्षक, अस्थापना, पोलिस महासंचालक कार्यालयात झाली आहे. त्यांच्या जागी मुंबईचे अप्पर पोलिस आयुक्त डी.एस. चव्हाण यांची बदली करण्यात आली आहे. या विषयीचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत.