Manoj Jarange Patil मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र पिंजून काढणार; दौरा केला जाहीर, 'या' दिवशी करणार सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 10:44 IST2023-11-09T10:44:07+5:302023-11-09T10:44:48+5:30
मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा सुरू करणार आहेत.

Manoj Jarange Patil मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र पिंजून काढणार; दौरा केला जाहीर, 'या' दिवशी करणार सुरुवात
गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबर पर्यंत वेळ दिला असून, जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथेली रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र दौरा करणार आहेत. आज या दौऱ्याची पाटील यांनी घोषणा केली आहे. पाटील यांचा दौरा १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या संदर्भात आज पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटील यांनी माहिती दिली.
थेट ISIS शी संबंधित पीएचडी विद्यार्थ्याला अटक, ATS पथकाची कारवाई
यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, आम्ही राज्यातील मराठा समाजाची गाठीभेटी घेण्यासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा सुरू करत आहे. १५ नोव्हेंबर २०२३ पासून ते २३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत हा तिसरा टप्पा सुरू करत आहे. तिसऱ्या टप्प्यातील १५ नोव्हेंबर रोजी वाशी, परांडा, करमाळा. १६ रोजी दौड, मायणी. १७ रोजी सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर, कराड. १८ रोजी सातारा, मेंढा, वाईस रायगड. १९ रोजी रायगड, रायगड दर्शन, रायगड ते पाचाड, महाड, मुळशी, आळंदी. २० रोजी आळंदी, तुळापूर, खालापूर, कल्याण, २१ नोव्हेंबर रोजी ठाणे, पालघर, नाशिक, त्रंबकेश्वर. २२ रोजी विश्रांतगड, संगमनेर, श्रीरामपूर. २३ रोजी नेवासा, शेवगाव, भोदेगाव, अवमापूर, धोंडेगाव. हा तिसऱ्या टप्प्यातील दौरा आहे.
'यासह हा तिसरा टप्पा संपणार आहे. आम्ही असे सहा टप्प्यात दौरा करणार. पुढं चौथा, पाचवा, सहाव्या टप्प्यातील दौरा करणार आहे, असंही जरांगे पाटील म्हणाले. '१ डिसेंबरपासून प्रत्येक गावात साखळी उपोषण सुरू करणार आहोत. जे आहेत साखळी उपोषण सुरू आहेत ते सुरुच ठेवायचं आहे. आम्ही हा महाराष्ट्र दौरा स्वखर्चाने करणार आहे. या अगोदरचा दौराही आम्ही स्वर्चाने केलेला आहे, कुणीही पैसे देऊ नये, असंही जरांगे पाटील म्हणाले. कुणीही पैसे मागत असेल तर त्याच्याकडून पैसे मागे घ्या, जर कोण असं पैसे घेत असल्याचं समोर आलं तर त्याला समाज माफ करणार नाही. आमच्या आंदोलनाला डाग लागू नये, असा इशाराही पाटील यांनी दिला.